पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश सीमेवर एकाच वेळी वाजले सायरन? भारताची चिंता वाढली, थेट श्रीहरिकोटा..

इस्रो 12 जानेवारी रोजी इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊस मागे राहिले. मिशन अयशस्वी झाल्यानंतर काही गंभीर प्रश्न निर्माण केली जात आहेत. याबाबत आता अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.

पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश सीमेवर एकाच वेळी वाजले सायरन? भारताची चिंता वाढली, थेट श्रीहरिकोटा..
India Pakistan Border Siren
| Updated on: Jan 14, 2026 | 10:24 AM

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 12 जानेवारी रोजी इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊस मागे राहिले. मात्र, या मिशन अयशस्वी झाल्यानंतर काही गंभीर प्रश्न निर्माण केली जात आहेत. ही ऐतिहासिक कामगिरी पीएसएलव्ही सी 62 मोहिमेद्वारे साध्य केली जाणार होती. मात्र, रॉकेट आपल्या नियोजित मार्गापासून भरकटले. यादरम्यान चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर विशिष्ट प्रकारचे सायरन वाजल्याचे सांगितले जात आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2026 चे हे इस्रोचे पहिले कक्षीय प्रक्षेपण होते. EOS-N1 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी PSLV C62 रॉकेटचा वापर करण्यात आला, ‘अन्वेषा’ असे नाव देण्यात आले आहे. हा एक हायपरस्पेक्ट्रल पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता.

हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले होते. अन्वेषा पृथ्वीची उच्च-रिझोल्यूशन छायाचित्रे घेईल, ज्याचा उपयोग सैन्य नकाशा तयार करण्यासाठी, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि युद्धाची तयारी करण्यासाठी केला जाणार होता. मात्र, भारत यापासून फक्त एक पाऊस मागे राहिला आहे. या मिशन फेल होण्याचे अनेक कारणे सांगितले जात आहेत.

ज्यावेळी श्रीहरिकोटा येथून हे रॉकेट सोडले गेले, त्यावेळी विशिष्ट प्रकारचे सायरन वाजल्याचे सीमेवर सांगितले जात आहे. यामुळे संशय अधिक वाढला. मात्र, याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाहीये. भारतीचे मिशन फेल करण्यामागे शेजारी देशांचा हात आहे का? यावर अजून स्पष्ट कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तांत्रिक बिघाडामुळे इस्रोचे पीएसएलव्ही रॉकेट मोहीम अयशस्वी झाल्याचे स्पष्ट शब्दात इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.

बाकी कोणत्याही गोष्टींचा त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आला नाही. या मोहिमेत सहभागी असलेल्या स्पॅनिश खाजगी कंपनीच्या लहान अंतराळ यानाने पुनर्प्रवेशाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे जमिनीवर त्याच्याकडून मिळालेल्या संकेतांची पुष्टी झाल्यानंतर, त्याची ओळख यशस्वीरित्या पटवण्यात आली आहे. रॉकेट निकामी होऊनही, केआयडीने अंदाजे 190 सेकंदांपर्यंत उड्डाणाचा डेटा प्रसारित करणे सुरू ठेवले. अशा परिस्थितीत कोणत्याही उपकरणाकडून कोणताही डेटा प्राप्त होत नाही, पण त्याने डेटा पाठवला.