AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 WC 2026 Schedule: स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी? जाणून घ्या

Women's T20 World Cup Schedule: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इंग्लंडकडे स्पर्धेचं यजमानपद असून 12 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 12 संघ भाग घेत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आणखी रंजक होणार आहे.

Women’s T20 WC 2026 Schedule: स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी? जाणून घ्या
Women’s T20 WC 2026 Schedule: स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी? जाणून घ्याImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 08, 2026 | 8:37 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 12 जूनपासून पुन्हा एकदा टी20 स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे असून अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून जेतेपदासठी महिनाभर चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झाल्याने यंदा सामन्यांची संख्याही पूर्वीपेक्षा अधिक आहे. भारतीय महिला संघाने नुकतंच वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा भारतीय क्रीडाप्रेमींची आहे. या स्पर्धेत भारताचे सामने कधी आणि केव्हा खेळले जाणार? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 12 संघ असल्याने सामन्यांची संख्या 33 झाली आहे. या सामन्यांसाठी इंग्लंडमधील सात मैदानं सज्ज आहेत. बर्मिंघमधील एजबेस्टन, मॅन्चेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, साउथॅम्प्टनमधील हॅम्पशर बाउल, लीड्समधील हेडिंग्ले, ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंड, लंडनमधील लॉर्ड्स आणि द ओव्हल या सात मैदानात सामने होती. या ठिकाणी 33 सामने होणार आहेत. हे सामने तीन वेगवेगळ्या वेळेनुसार खेळवले जाणार आहे. साखळी फेरीसाठी एकूण 12 संघ असून सहा-सहा असे दोन गटात विभागले गेले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडिया अ गटात आहे. या गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान संघही आहे. तर गतविजेता न्यूझीलंड संघ ब गटात आहे.

अ गट : भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, नेदरलँड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका

ब गट: इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडिज

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक

12 जून

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, एजबेस्टन (बर्मिंगहॅम) – रात्री 11:00 वाजता

13 जून

स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) दुपारी 3:00 वाजता

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) सायंकाळी 7:00 वाजता

वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, रात्री 11:00 वाजता

14 जून

बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स, एजबेस्टन (बर्मिंगहॅम) दुपारी 3:00 वाजता

भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबेस्टन (बर्मिंगहॅम) सायंकाळी 7:00 वाजता

16 जून

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, सायंकाळी 7:00 वाजता

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, रात्री 11:00 वाजता

17 जून

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, हेडिंग्ले (लीड्स) दुपारी 3:00 वाजता

भारत विरुद्ध नेदरलँड्स, हेडिंग्ले (लीड्स) सायंकाळी 7:00 वाजता

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, एजबेस्टन (बर्मिंगहॅम) रात्री 11:00 वाजता

18 जून

वेस्ट इंडीज विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले (लीड्स) रात्री 11:00 वाजता

19 जून

न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, रात्री 11:00 वाजता

20 जून

ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, दुपारी 3:00 वाजता

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, हॅम्पशायर बाऊल, साउथहॅम्प्टन, सायंकाळी 7:00 वाजता

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले (लीड्स) रात्री 11:00 वाजता

21 जून

वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) दुपारी 3:00 वाजता

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) सायंकाळी 7:00 वाजता

23 जून

न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) दुपारी 3:00 वाजता

श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) सायंकाळी 7:00 वाजता

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, हेडिंग्ले (लीड्स) रात्री 11:00 वाजता

24 जून

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्ड्स, लंडन, रात्री 11:00 वाजता

25 जून

भारत विरुद्ध बांगलादेश, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) सायंकाळी 7:00 वाजता

दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) रात्री 11:00वाजता

26 जून

श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) रात्री 11:00 वाजता

27 जून

पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) दुपारी 3:00 वाजता

वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड (ब्रिस्टल) सायंकाळी 7:00 वाजता

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल, लंडन, रात्री 11:00 वाजता

28 जून

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, लॉर्ड्स, लंडन, दुपारी 3:00 वाजता

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, लॉर्ड्स, लंडन, सायंकाळी 7:00 वाजता

30 जून

उपांत्य फेरी 1 (गट अ विजेता विरुद्ध गट ब उपविजेता), द ओव्हल (लंडन) सायंकाळी 7:00 वाजता

2 जुलै

उपांत्य फेरी 2 (गट ब विजेता विरुद्ध गट अ उपविजेता), द ओव्हल (लंडन) – रात्री 11:00 वाजता

5 जुलै

अंतिम सामना, (उपांत्य फेरी 1 विरुद्ध उपांत्य फेरी 2) लॉर्ड्स, (लंडन) सायंकाळी 7:00 वाजता

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा