AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या एका सामन्याला इतकी प्रसिद्धी का?’ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्मृती मंधानाने स्पष्टच सांगितलं की…

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता तयारी अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत क्रीडाप्रेमींचं लक्ष भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. पण स्मृती मंधानाने या स्पर्धेसाठी एक विशेष आवाहन केलं आहे. नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊयात...

'त्या एका सामन्याला इतकी प्रसिद्धी का?' टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्मृती मंधानाने स्पष्टच सांगितलं की...
'त्या एका सामन्याला इतकी प्रसिद्धी का?' टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्मृती मंधानाने स्पष्टच सांगितलं की...Image Credit source: PTI
| Updated on: Jun 05, 2026 | 5:16 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आतापासून लागून आहे. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी होणार आहे. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. या सामन्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असतं. तसे या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर रान पेटलेलं असतं. दोन्ही देशातील क्रीडाप्रेमी पोस्टचा भडिमार करून सामन्याचं वातावरण पेटवतात. इतकंच काय तर एकमेकांच्या पोस्टवर तुटून पडतात. असं असताना या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांना एक विशेष आवाहन केलं आहे.

काय म्हणाली स्मृती मंधाना?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मृती मंधाना म्हणाली की, बर्मिंगहॅम 2022 येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आम्ही भारत-पाकिस्तान सामना खेळलो होतो. त्या सामन्याला संपूर्ण मैदान हाऊसफुल झाले होते. तर इतर सामन्यांसाठीही तशीच क्रेझ असावी.एका सामन्यासाठी विशेष प्रसिद्धी मिळवण्याची गरज नाही, कारण त्याबद्दल आधीच पुरेशी क्रेझ आहे. मला आशा आहे की सर्व चाहते संपूर्ण स्पर्धेत आम्हाला पाठिंबा देतील. महिला टी20 क्रिकेटचा इतिहास पाहता, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अजिंक्य आहे. हे दोन संघ 16 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने 13 वेळा विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 सामने जिंकता आले आहेत.

साखळी फेरीत भारताचे सामने

भारताला या स्पर्धेच्या साखळी फेरीत फक्त पाकिस्तानचाच नव्हे, तर इतर बलाढ्य संघांचाही सामना करावा लागणार आहे. 14 जूनला पाकिस्तानशी सामना झाल्यानंतर नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. तेव्हा भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप