Gaganyaan: गगनयान मिशन, इस्त्रोकडून एस्ट्रोनॉट्सच्या ट्रेनिंगचा व्हिडियो, झीरो ग्रेव्हीटीमध्ये योग

isro gaganyaan mission: व्हिडिओमध्ये गगनयान मोहिमेसाठी निवडलेले चार अंतराळवीर प्रशिक्षण घेत असल्याचे दाखवले आहे. सर्व अंतराळवीर नियमितपणे निश्चित मॉड्यूलमध्ये योगासने करतात. त्यानंतर त्यांना स्पेसफ्लाइट, शून्य गुरुत्वाकर्षण आणि इतर आव्हानांनुसार प्रशिक्षण दिले जाते.

Gaganyaan: गगनयान मिशन, इस्त्रोकडून एस्ट्रोनॉट्सच्या ट्रेनिंगचा व्हिडियो, झीरो ग्रेव्हीटीमध्ये योग
isro gaganyaan
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 4:48 PM

भारताच्या चंद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) नवीन मोहीम सुरु केली आहे. इस्त्रोचे गगनयान मिशन सुरु होणार आहे. या मिशनमध्ये इस्त्रो अंतराळात मानव पाठवणार आहे. दीर्घकाळापासून अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांचे (एक्ट्रोनॉट्स) प्रशिक्षण सुरु आहे. या वर्षाच्या शेवटी इस्त्रोचे गगनयान अंतराळात झेपवणार आहे. गगनयानचे एकूण तीन उड्डान होणार आहे. पहिल्या दोन उड़्डानात अंतराळवीर जाणार नाही. परंतु तिसऱ्या उड्डानात अंतराळवीर तीन दिवसांसाठी जाणार आहे. मार्च महिन्यापर्यंत ते अंतराळात जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांचे कठोर प्रशिक्षण सुरु आहे. त्याचा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इस्त्रोकडून जारी करण्यात आला आहे.

हे आहेत अंतळात जाणारे अंतराळवीर

व्हिडिओमध्ये गगनयान मिशनमध्ये निवड झालेले ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजीत कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचे कठोर प्रशिक्षण होत असल्याचे दिसत आहे. झीरो ग्रेव्हीटीमध्ये ते योग करत आहेत. हे चार भारतीय हवाई दलात टेस्ट पायलट आहे. सर्वांना भारतीय हवाई दलाचे जेट फायटर प्लेनसुद्धा उडवले आहे.

हे सुद्धा वाचा

…भारत ठरणार चौथा देश

निवड झालेल्या अंतराळवीरांचे रशियामध्ये प्रशिक्षण झाले आहे. गगनयानमधून हे अंतराळात जाणार आहे. त्यासाठी एलएमवी-3 यानाचा वापर इस्त्रो करणार आहे. आतापर्यंत अंतळात मानव पाठवण्यास केवळ तीन देशांनाच यश आले आहे. त्यात अमेरिका, रशिया, चीनचा समावेश आहे. आता अंतराळात मानव पाठवणारा भारत चौथा देश बनवणार आहे. आतापर्यंत विविध अभियानातून 44 देशांचे अंतराळवीर अंतराळात गेले आहे.

अंतराळवीरांचे कठोर प्रशिक्षण

व्हिडिओमध्ये गगनयान मोहिमेसाठी निवडलेले चार अंतराळवीर प्रशिक्षण घेत असल्याचे दाखवले आहे. सर्व अंतराळवीर नियमितपणे निश्चित मॉड्यूलमध्ये योगासने करतात. त्यानंतर त्यांना स्पेसफ्लाइट, शून्य गुरुत्वाकर्षण आणि इतर आव्हानांनुसार प्रशिक्षण दिले जाते. अंतराळवीर किती कठोर प्रशिक्षण घेत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.