AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या त्या खोलीत 1 तरूणी, दोन तरूण; दरवाजा उघडताच खळबळ… रूम नंबर 204 मध्ये काय सुरू होतं ?

जयपूरच्या हॉटेलमधील खोली क्रमांक 204 मध्ये धाड टाकताच पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली, महिना 18 लाखांची त्यांची कमाई होती, असा अंदाज आहे.नक्की काय घडलं त्या खोलीत ?

हॉटेलच्या त्या खोलीत 1 तरूणी, दोन तरूण; दरवाजा उघडताच खळबळ... रूम नंबर 204 मध्ये काय सुरू होतं ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 29, 2026 | 9:22 PM
Share

जयपूरमधल्या हॉटेलची ही कहाणी आहे. हॉटेलमधील खोली नंबर 204… बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य परिस्थिती.. ना काही संशयास्पद हालचाल, ना कोणताही गोंधळ. पण पोलिसांनी या खोलीचा दरवाजा ठोठावताच संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. त्या खोलीत 2 तरूण आणि 1 तरूणी होती. ते तिघे मिळून क्रिकेटसह इतर खेळांवर ऑनलाइन सट्टा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयपूरच्या वैशाली नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकला आणि थेट खोली क्रमांक 204 गाठली.

खोलीची झडती घेताच..

पोलिसानी खोलीत प्रवेश करत त्या खोलीची झडती घ्यायला सुरूवात केली आणि तेव्हाच मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टॅबलेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांच्या हाती लागली. या गॅजेट्सची तपासणी सुरू केली असता, मोठा खुलासा झाला. हॉटेलच्या एका छोट्याशा खोलीतून कथितपणे सुरू असलेल्या सट्टेबाजीच्या मोठ्या व्यवहाराची माहिती समोर आली आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुमारे 6 लाख रुपयांच्या व्यवहाराचा हिशोब आढळल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या आरोपींना या अवैध व्यवसायातून महिन्याला अंदाजे 18 लाख रुपये तरी मिळत असतील असा दावा पोलिसांनी केला आहे. क्रिकेट आणि इतर खेळांवर ऑनलाइन पैसे लावले जात असल्याचा आरोप आहे. म्हणजेच मैदानावर सामना सुरू असताना हॉटेलच्या खोलीत बसून त्याच्या निकालावर पैशांचा खेळ सुरू होता.

दोन लॅपटॉप, 5 मोबाईल जप्त

या खोलीची झडती घेतल्यावर आणि सट्टेबाजी उघड झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप, एक टॅबलेट आणि पाच मोबाइल फोन जप्त केले. आता हीच गॅजेट्स या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरताना दिसत आहेत. सट्टेबाजीचं हे नेटवर्क किती दूरपर्यंत पसरलं होतं, याचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडू या उपकरणांमधील डेटा तपासला जाणार आहे.

सतत बदलायचे जागा, आरोपींची मोडस ऑपरंडी उघड 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख नेपाळमधील अशोक पौडेल, परीना गिरी आणि पुण्यातील पवन वैष्णव अशी झाली आहे. एवढंच नव्हे तर प्राथमिक चौकशीत आणखी एक महत्वाची बाब समोर आली. ती म्हणजे हे आरोपी ऑनलाइन सट्टेबाजीचा व्यवसाय कदीच एका जागी राहून करत नव्हते, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, जागा बदलून त्यांचा व्यवसाय सुरू ठेवायचे. म्हणजेच जयपूरमधील हे हॉटेल कदाचित या कथित सट्टेबाजीच्या नेटवर्कचं फक्त एक ठिकाण होतं. त्यामुळे याआधी किती जागांहून ही सट्टेबाजी करण्यात आली ? असा प्रश्नही आता उपस्थितहोत आहे. या आरोपींच्या संपर्कात कोण होतं आणि मिळालेला हा सगळा पैसा शेवटी जायचा तरी कुठे ? असे अनेक सवाल समोर असून तपासातून पोलिस या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइल, लॅपटॉप आणि टॅबलेटची तांत्रिक तपासणी सुरू आहे. या उपकरणांमधील चॅट्स, ऑनलाइन व्यवहार, सट्टेबाजीशी संबंधित अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. त्यामुळे आता जयपूरच्या हॉटेलमधील खोली फक्त एक रूम राहिली नसून या कथित सट्टेबाजीच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यासाठी पोलिसांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा