AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजित डोवाल यांनी खरा इतिहास वाचावा”; काँग्रेस नेत्याने ‘त्या’ वक्तव्याविषयी राष्ट्रीय सल्लागाराला फटकारले

भारताच्या फाळणीला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे तितकेच जबाबदार होते. तसेच तृणमूलच्या खासदारानीही सांगितले होते की, मुस्लिम लीगच्या वेगळ्या देशाच्या मागणीला सीपीआयकडूनही पाठिंबा दर्शवला होता.

अजित डोवाल यांनी खरा इतिहास वाचावा; काँग्रेस नेत्याने 'त्या' वक्तव्याविषयी राष्ट्रीय सल्लागाराला फटकारले
| Updated on: Jun 17, 2023 | 11:13 PM
Share

नवी दिल्ली : सध्या वेगवेगळ्या मुद्यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि काँग्रेसचे अधूनमधून इतिहासातील वेगवेगळ्या मुद्यांवरून वाद उफाळून येत आहेत. त्यातच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा इतिहासातील एका मुद्यावरून वाद उखरून काढला आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही कारण 1940 पर्यंत नेताजी सुभाषबोस चंद्र यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती.

त्यावर त्यांचेही मत असू शकते पण तो प्रश्न त्यांच्या विरोधातील असू शकतो. मात्र डोभालही आता इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या गटात सामील झाल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नेताजींचे गांधींना आव्हान

जयराम रमेश यांनी अजित डोवाल यांना सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. यावर त्यांनी सांगितले की, अजित डोवाल यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात नाहीत. मात्र सध्या ते एका वेगळ्या टोळीत सामील झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना त्यांनी प्रश्न केला आहे की, नेताजींनी गांधींना आव्हान दिले का? त्याच प्रमाणे नेताजी डावे होते का? अर्थात ते होते. नेताजी धर्मनिरपेक्ष होते का? त्यामुळे नेताजी हयात असते तर फाळणी झाली नसती का? कोण म्हणेल कारण 1940 पर्यंत नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक निर्माण केला होता. या सगळ्यावर तुमचं मत काय असे एका पेक्षा एक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

खरा इतिहास वाचवा

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, डोवाल यांच्याकडून एकही गोष्ट स्पष्टपणे बोलले नाहीत. नेताजींचे थोरले बंधू सरतचंद्र बोस यांचा तीव्र विरोध असतानाही बंगालच्या फाळणीला पाठिंबा देणारे श्यामा प्रसाद मुखर्जी होते. त्यामुळे आता मी डोवाल यांना रुद्रांशु मुखर्जी यांच्या 2015 मध्ये आलेले एक उत्कृष्ट पुस्तक पॅरलल लाइव्हजची एक प्रत पाठवत असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आहे. त्या पुस्तकातून त्यांनी तो खरा इतिहास तरी वाचून पाहावा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

गांधींना आव्हान देण्याचं धाडस

याआधी डोवाल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल एक व्याख्यान दिले होते, त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की, नेताजी यांच्यामध्ये महात्मा गांधींना आव्हान देण्याचे धाडस होते आणि ते असते तर भारताची फाळणी झाली नसती, तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर रे यांनी सांगितले की, भारताच्या फाळणीला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे तितकेच जबाबदार होते. तसेच तृणमूलच्या खासदारानीही सांगितले होते की, मुस्लिम लीगच्या वेगळ्या देशाच्या मागणीला सीपीआयकडूनही पाठिंबा दर्शवला होता.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.