जम्मू काश्मिरमध्ये लष्करी वाहनाजवळ जबरदस्त स्फोट, एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक सुरूच

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती, त्यामध्ये दहशतवादी ठार झाला आहे.

जम्मू काश्मिरमध्ये लष्करी वाहनाजवळ जबरदस्त स्फोट, एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक सुरूच
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 10:03 PM

जम्मू-काश्मीरः गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कारवायांना ऊत आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाजवळ मोठा स्फोट घडवून आणल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कोणतीही हानी झाली नसून लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे, कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून, यामध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले असून या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे.

तर त्याचवेळी लष्कराच्या वाहनावर झालेल्या स्फोटामुळे आता दहशतवाद्यांविरोधात कठोर शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

तर दुसरीकडे, कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना लष्कराने लष्कर-ए-तैयबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले आहे.

या ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, एक पिस्तूल, दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

तो दहशत पसरवण्याच्या उद्देशाने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

या प्रकरणी श्रीनगर येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल अमरोन मौसावी यांनी सांगितले की, पोलीस आणि इतर गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती आणि त्या आधारे सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्रीच या भागात संयुक्त मोहीम राबवून शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.