AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये चंपाई सोरेन ‘राज’, विश्वासदर्शक ठराव जिंकला

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर चंपाई साेरेन यांची पक्षाच्या विधिमंडळ नेती म्हणून निवड झाली होती. नव्या सरकारला आज बहुमत सिद्ध करायचं होतं. हा विश्वासदर्शक ठराव सोरेन यांनी जिंकला आहे.

Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये चंपाई सोरेन 'राज', विश्वासदर्शक ठराव जिंकला
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 05, 2024 | 2:58 PM
Share

मुंबई : झारखंडचे मजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्यासंबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर चंपाई सोरेन यांची आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली होती. शुक्रवारी राजभवनामध्ये चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारचा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडला. यामध्ये चंपाई सोरेन यांना एकूण 47 मते तर विरोधकांना एकूण 29 मते पडली आहेत.

आमदारांचा घोडेबाजार रोखण्यासाठी जेएमएम आणि युतीमधील सर्व आमदारांना हैदराबादला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी रांचीमधील सर्किट हाऊसमध्ये त्यांना आणण्यात आलेलं. विश्वासदर्शक ठराव जिंकत झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी चंपाई सोरेन असणार आहेत. पीएमएलए कोर्टाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये भाग घेण्याची परवानगी दिली होती.

भाजपला माझं आव्हान आहे की, माझ्यावर केले गेलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत. जर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल, फक्त राजकारण नाहीतर मी झारखंड सोडून देईल. केंद्राच्या कारस्थानानंतर माझ्या अटकेत राजभवनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे.

दरम्यान,  झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नवीन नेत्याची निवड करण्यात आली. 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच