AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघाताचा थरार! ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक

Jharkhand major Accident : झारखंडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

भीषण अपघाताचा थरार! ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक
| Updated on: Jun 26, 2026 | 9:31 AM
Share

झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील रजप्पा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. रामगढ-बोकारो रस्त्यावर रात्री १२ वाजता ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक झाली. यात पिकअप वाहनातून प्रवास करणाऱ्या ‘बेन्जो पार्टी’चे सदस्य गंभीर जखमी झाले. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगड-बोकारो रस्त्यावर मध्यरात्री दोन वाहनांची धडक झाली. एका वाहनात बसलेल्या ‘बेन्जो पार्टी’चे सदस्य गंभीर जखमी झाले. अपघात मरण पावलेले व्यक्ती हे मारंगमार्चा गावातील रहिवासी होते.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनाची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. रामगडमधील रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. अनिल कुमार यांनी सांगितलं की, ‘अपघातानंतर ८ जणांना रुग्णालयात आणलं गेलं. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर होती. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचार करून रांची येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तर मृत व्यक्तींचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठेवण्यात आले आहेत.

https://x.com/PTI_News/status/2070340896999317757?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2070340896999317757%7Ctwgr%5Eb6411b32683c4790f0f6a2cc4704ef2dedf112a4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fjharkhand%2Fmany-people-died-after-collision-between-vehicle-and-truck-in-ramgarh-2026-06-26-1227424

रामगडचे पोलीस अधिकारी आलोक रंजन यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चुकीच्या मार्गात घुसला. त्यानंतर या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या पिकअपला धडक दिली. पोलिसांनी या अपघातप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघातामागील कारण शोधण्याचं काम सुरू आहे.

तत्पूर्वी, स्थानिकांच्या आरोपांनुसार, चार दिवसांपूर्वी अपघाताची मोठी दुर्घटना घडली होती. दोन अपघातात मिळून १० जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची चेतावणी देणारी फलके आणि चिन्हे लावण्यात आलेली नाहीत. तसेच अपघात रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सलग दोन भीषण अपघात घडल्याने रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?