असे कसे शक्य…मंत्र्याचा मुलगा बनला कोर्टात शिपाई…पुतण्या वेटींग लिस्टवर

Government Job: एखादा मंत्र्याचा मुलगा शिपाई होणार का? अर्थात या प्रश्नाला नकारार्थी उत्तर असेल. परंतु झारखंडमधील मंत्र्याचा मुलगा न्यायालयात शिपाई होणार आहे. विशेष म्हणजे या मंत्र्याचा पुतण्यानेही या पदासाठी अर्ज केला. परंतु तो वेटींग लिस्टमध्ये आहे.

असे कसे शक्य...मंत्र्याचा मुलगा बनला कोर्टात शिपाई...पुतण्या वेटींग लिस्टवर
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 9:57 AM

रांची | 4 डिसेंबर 2023 : सरकारी नोकरीसाठी अनेक युवकांचे प्रयत्न सुरु असतात. मग पीएचडी आणि इंजिनिअर झालेले युवक शिपायाच्या पदासाठी अर्ज करतात. निवड झाल्यावर शिपाई म्हणून काम करणारे अनेक उच्चशिक्षित युवक देशात आहे. परंतु एखादा मंत्र्याचा मुलगा शिपाई होणार का? अर्थात या प्रश्नाला नकारार्थी उत्तर असेल. आता झारखंडमधील मंत्र्याचा मुलगा न्यायालयात शिपाई होणार आहे. ज्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसला महिन्याला लाखो रुपये मिळतात, त्या मंत्र्याचा मुलगा मात्र वर्ग चारची नोकरी करणार आहे. झारखंडमधील मंत्री सत्यानंद भोक्ता यांच्या मुलाचे शिपाई म्हणून सिलेक्शन झाले आहे.

१९ जागांमध्ये मुलगा अन् पुतण्या

झारखंडमधील चतरा न्यायालयात १९ शिपायांच्या जागा निघाल्या होत्या. त्यासाठी मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा मुकेश कुमार भोक्ता यानेही अर्ज केला होता. त्याची मुलाखत झाली. त्यानंतर निकाल जाहीर झाला. त्यात तो १३ व्या क्रमांकावर आहे. एसटी प्रवर्गातून त्याची निवड झाली आहे. या जागेसाठी सत्यानंद भोक्ता यांचा पुतण्या रामदेव कुमार भोक्ता यानेही अर्ज केला होता. तो वेटींग लिस्टवर आहे. म्हणजे १९ उमेदवारांपैकी एखादा उमेदवार रुजू झाला नाही तर त्याला संधी मिळणार आहे.

भाजप प्रवक्ता म्हणातात…

मुकेश कुमार भोक्ता याच्या निवडीवर भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. राज्यात रोजगाराच्या संधी कमी आहे. मुकेश कुमार याला रुजू होण्यासाठी १२ डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. आपण त्या तारखेच्या आत रुजू होणार असल्याचे मुकेश कुमार याने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी लग्न ठरले होते वादात

सत्तानंद भोक्ता लालू यादव याच्या आरजीडी पक्षाचे आमदार आहे. सध्या राज्यात श्रम, नियोजन आणि कौशल्य विकास खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचा मुलगा मुकेश कुमार याच्या लग्नवरुन काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. दुसऱ्या समाजातील मुलीसोबत लग्न केल्यामुळे त्यांच्याबर भोगता समाजाने सामाजिक बहिष्कार टाकला होता. त्यावेळी आपल्यामुळे भोक्ता समाजाची ओळख असल्याचे सत्यानंद भोक्ता यांनी म्हटले होते.

Non Stop LIVE Update
10 वर्षांनी विरोधी बाकांवर जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला
10 वर्षांनी विरोधी बाकांवर जास्त संख्या, विरोधक वाढले अन् आवाजही वाढला.
लोकसभेचे निकाल लागताच, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महायुतीतून आऊटगोईंग
लोकसभेचे निकाल लागताच, विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महायुतीतून आऊटगोईंग.
फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत
फक्त ओबीसींनाच एंट्री, गावा-गावात पोस्टर, आरक्षणाची लढाई गावबंदीपर्यंत.
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.