सरकार चर्चेसाठी तयार, पण राहुल गांधींना आंदोलन चिघळवायचंय, जितेंद्र सिंह यांचा गंभीर आरोप!
राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला.

Rahul Gandhi Delhi Protest : राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विरोधी बाकावरील राजकीय पक्षांचे खासदार, आमदार तसेच नेतेमंडळींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढे हे आंदोलन करण्यात आले. त्यांनी केंद्र सरकारपुढे एकूण पाच मागण्या ठेवल्या आहेत. राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांची भूमिका काय आहे? याबाबत जितेंद्र सिंह यांनी सविस्तर सांगितले आहे.
राहुल गांधींनी यूटर्न घेतला
राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि लाठीचार्ज यावर संसदेत चर्चा करायला तयार आहे. आम्हाला कोणतीच अडचण नाही. आम्ही राहुल गांधींसमोर ही गोष्ट ठेवली, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच केंद्राने काँग्रेसला संसदेत चर्चा करायला परवानगी दिली तर आम्ही आंदोलनातून मागे हटू असं राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही त्यांना होकार कळवला. पण त्यांनी यूटर्न घेतला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. ते म्हणाले, आता आमची इच्छा. आम्ही हटणार नाही, अशी राहुल गांधी यांची भूमिका असल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला.
कुछ समय पहले, यह ज्ञात हुआ कि कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, श्री मल्लिकार्जुन खड़गे और उनके साथ अन्य वरिष्ठ नेता, जैसे कि श्री राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी इत्यादि अकस्मात ही अकबर रोड़ के समीप एक स्थान पर अपने समर्थकों के साथ धरने पर बैठ गयेहैं। सरकार ने इस वरिष्ठ…
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) July 21, 2026
त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही
राहुल गांधी यांच्या या भूमिकेनंतर हे योग्य नाही. तुम्ही शब्द फिरवत आहात, असं आम्ही त्यांना म्हणालो. त्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा. मी कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी आहे. राहुल गांधींनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना सरकारसोबत चर्चाच करायची नाही. त्यांना आंदोलन चिघळवायचं आहे, असाही आरोप जितेंद्र सिंह यांनी केला. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही राहुल गांधी ऐकत नसेल तर योग्य नाही, असंही त्यांनी बोलून दाखवलं.