AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजबच घडलं ! पोलिसांच्या गाडीशी कारची धडक अन् उघडली ‘सोन्याची खाण’

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवेवर अपघातानंतर तपासणी करताना पोलिसांना कारमध्ये तब्बल 10 किलो सोन्याची बिस्किटं सापडली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून सोन्याच्या मालकी, स्रोत आणि तस्करीच्या शक्यतांचा कसून तपास सुरू केला आहे. कस्टम विभागाच्या मदतीने सोन्याचे अचूक वजन व शुद्धता निश्चित केली जात आहे.

अजबच घडलं ! पोलिसांच्या गाडीशी कारची धडक अन् उघडली 'सोन्याची खाण’
बॅगेत सापडलं कोट्यवधींचं सोनं
| Updated on: Aug 22, 2026 | 8:55 PM
Share

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे एका अपघातानंतर तपास सुरू होता, मात्र त्यावेळी असं काही सापडलं ज्याने पोलिसही अवाक् झाले. सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवेवर दोन वाहनांची धडक झाल्यानंतर पोलिसांनी नियमानुसार कारची तपासणी केली. मात्र, त्याच कारमधील एका बॅगेने पोलिसांचे लक्ष वेधून घेतलं आणि ती बॅग उघडताच त्यांना धक्काच बसला ना राव! कारण त्या बॅगमध्ये साधसुधं सामान नव्हे तर सोनं होतं सोनं, तेही तब्बल 10 किलो. हो , हे खरं आहे. त्या कारमधल्या बॅगमध्ये सुमारे 10 किलो वजनाची सोन्याची बिस्किटं होती, अशी माहिती समोर आली. मात्र, अधिकृत तपासणीनंतरच सोन्याचे अचूक वजन आणि शुद्धता स्पष्ट होणार आहे.

कांवड ड्युटीवरून परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला कारची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तालग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनऊ-आगरा एक्सप्रेस वेवर घडली. कांवड यात्रेच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी ड्युटी संपवून परतत होते. तेव्हाच त्यांच्या वाहनाची एका कारला धडक बसली. त्यानंतर पोलीस खाली उतरले आणि खबरदारी म्हणून कारची तपासणी सुरू केली. तेवढ्यात त्या कारमध्ये ठेवलेल्या एका बॅगेवर त्यांची नजर गेली. बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये सोन्याची बिस्किटं असल्याचे समोर आलं.

या कारमध्ये सोने सापडल्यानंतर पोलिसांनी त्यातील दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं कुठून आलं? ते कोणाचं आणि ते नेमकं कुठे नेलं जात होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. तसेच सोन्याशी संबंधित कागदपत्रांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. हे सोनं कायदेशीर पद्धतीने वाहून नेलं जात होतं की त्यामागे तस्करीचा काही संबंध आहे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कस्टम विभागाला माहिती दिली.

बॅगेत सापडलेलं ते सोनं सुमारे 10 किलो होतं अशी माहिती सध्या समोर आली आहे. मात्र सोन्याचं अचूक वजन आणि शुद्धता निश्चित करण्यासाठी स्थानिक सराफाचीही मदत घेण्यात येत आहे. संपूर्ण तपासानंतरच त्याचं वजन, बाजारातील किंमत,  मालकी कोणाची आणि ते कुठून आलं, याचा स्रोत याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकेल.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा