AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदाबाद विमान अपघातानंतर केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू

केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. खराब हवामान अपघातामागे कारण असावे असे म्हटले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच प्रौढ आणि दोन मुले होते. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचावकार्यात गुंतली आहेत.

अहमदाबाद विमान अपघातानंतर केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू
kedarnath helicopter crash
| Updated on: Jun 15, 2025 | 8:54 AM
Share

अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी तर 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यानंतर विमानाला आग लागली. या विमानात २३० प्रवासी, २ पायलट आणि १० कर्मचारी होते. या भीषण दुर्घटनेत १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, त्यातच आता केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

खराब हवामानामुळे अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचं एक हेलिकॉप्टर कोसळलं. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ हा मोठा अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.

केदारनाथमधील गौरीकुंड परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर त्या ठिकाणी गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या टीम्स लगेच घटनास्थळी पोहोचल्या. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत 5 प्रौढ आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखुरलेले पडले आहेत. या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केली आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. यासाठी केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह म्हणाले.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान चारधाम यात्रेदरम्यान भाविक त्रास टाळण्यासाठी आणि चढाई न करता हेलिकॉप्टरचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या काळात केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी उड्डाण करण्यापूर्वीच आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता.१७ मे रोजी केदारनाथमध्ये एक एअर एम्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते. सुदैवाने ते तिघेही सुरक्षित बचावले होते. हे हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला जात होते. त्यावेळी लँडिंग करताना हा अपघात झाला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.