Kerala Assembly Election 2021 : प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केलेली चूक एका भाजप खासदाराने सुधारुन सांगितली. इतकच नाही तर या भाजप खासदाराने प्रियंका गांधींना एक खोचक सल्लाही दिलाय.

Kerala Assembly Election 2021 : प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी
सागर जोशी

|

Mar 31, 2021 | 8:03 PM

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज एका ट्विटमुळे चांगल्याच चर्चिल्या गेल्या आणि त्यावर ट्रोलिंगही मोठ्या प्रमाणात झालं. मात्र प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केलेली चूक एका भाजप खासदाराने सुधारुन सांगितली. इतकच नाही तर या भाजप खासदाराने प्रियंका गांधींना एक खोचक सल्लाही दिलाय. त्याचं झालं असं की प्रियंका गांधी यांनी यांनी केलेल्या ट्वीट मध्ये निवडणूक लढवण्याचं वय चुकलं होतं. त्यावर भाजपचे लडाखमधील खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना गप्प राहण्याचा सल्ला दिलाय.(Mistake in a tweet by Priyanka Gandhi, BJP MP Jamyang Sering Namgyal Criticizes Priyanka)

प्रियंका गांधी कुठे चुकल्या?

प्रियंका गांधी यांनी एक ट्वीट केलं आणि त्यात त्या म्हणाल्या की, “मला गर्व आहे की केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार हे 20 ते 40 वर्षामधील आहेत. वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि अभ्यासासह संयुक्त रुपाने ते एक जबरदस्त ताकद निर्माण करतात. मला आशा आहे की, त्यांना केरळच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली जाईल. जेणेकरुन यूडीएफच्या दृष्टीकोनाचा अनुभव घेतला जाऊ शकतो”.

भाजप खासदाराचा जोरदार टोला

या ट्वीटमध्ये प्रियंका गांधी यांनी युवा उमेदवारांचं कमीत कमी वय 20 वर्षे लिहिलं होतं. त्यावरुन सोशल मीडियावर त्यांच्या राजकीय ज्ञानावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातच जमयांग सेरिंग नामग्याल यांनीही प्रियंका गांधी यांना उत्तर दिलं. “जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियमांच्या मूळ गोष्टी माहिती नाहीत तर गप बसणे हा चांगला पर्याय असतो”, असा टोला नामग्याल यांनी लगावला आहे.

“भारतात निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी 25 वर्षे वय असणे अनिवार्य आहे. आता तुमच्या 20 ते 25 वर्षांमधील उमेदवारांचं काय होईल?” असा खोचक प्रश्नही नामग्याल यांनी पुढे विचारलाय. प्रियंका गांधी यांच्या या ट्वीटला अनेकांनी उत्तरं दिली आहे. त्यात प्रियंका गांधी यांची खिल्लीही उडवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

कर्नाटकातील ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार, कोर्टाची परवानगी; येडियुरप्पांना झटका

सत्ता आल्यास काँग्रेस पक्ष प्रत्येक महिन्याला गृहिणींना 1000 रुपये देणार

Mistake in a tweet by Priyanka Gandhi, BJP MP Jamyang Sering Namgyal Criticizes Priyanka

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें