AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळात भाजपाच्या उमेदवार होत्या सोनिया गांधी ? देशात झाली होती चर्चा, अखेर…

राजकारणात पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह यामुळे मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रकार अधुनमधून होत असतो. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ उडाला होता. केरळातही तसाच प्रकार झाला होता.

केरळात भाजपाच्या उमेदवार होत्या सोनिया गांधी ? देशात झाली होती चर्चा, अखेर...
| Updated on: Jan 19, 2026 | 9:50 PM
Share

केरळातील इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार पंचायत निवडणूकीत भाजपाची सोनिया गांधी नावाची उमेदवार चर्चेत आली होती. या नावामुळे या राज्यासह देशभरात या तरुणीची चर्चा सुरु होती. अनेकांना वाटेल की सोनिया गांधी यांचे नाव आणि भाजपाची उमेदवार कशी काय ? या मागे देखील एक कहाणी दडलेली आहे.स्थानिक निवडणूकात भाजपच्या या उमेदवाराला सोनिया गांधी यांच्या नावाचा काही फायदा होणार की तोटा याची सर्वत्र चर्चा सुरु होती. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावासारखे हुबेहुब नावाच्या भाजपाच्या उमेदवार असल्याने ही निवडणूक रंगतदार झाली होती..

मुन्नार ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत भाजपाच्या कार्यकर्त्या सोनिया गांधी यांना उमेदवारी मिळाली होती. भाजपाचे नेतृत्व विरोधी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्यामुळे सोनिया गांधी नावाच्या उमेदवाराला भाजपाचे तिकीट कसे काय मिळाले याची चर्चा सुरु होती.यामागे या सोनिया गांधी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जबाबदार आहे.

Kerala BJP candidate Sonia Gandhi finally lost the panchayat election

Kerala BJP candidate Sonia Gandhi finally lost the panchayat election

वडील काँग्रेसमध्ये आणि पती भाजपात

सोनिया गांधी यांचे दिवंगत पिता दुरे राज हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते नल्लथानी कल्लार क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे सक्रीय चेहरा होते.या काँग्रेस नेत्याने सोनिया गांधी यांचा प्रती असलेला आदर आणि सन्मान दाखवण्यासाठी त्यांच्या नवजात कन्येचे नाव सोनिया गांधी असे ठेवले होते. परंतू जीवनाच्या प्रवाहात राजकारणात सतत बदलत असते. सोनिया हीचा राजकीय प्रवास देखील असाच झाला. सोनिया हीच्या विवाहानंतर तिने राजकीय दिशा बदलली. तिचे पती सुभाष भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. आता पंचायत समितीचे जनरल सेक्रेटरी देखील आहेत. दीड वर्षांपूर्वी मुन्नारच्या जुन्या मोलक्कडा वॉर्डातील उपनिवडणूकीत ते भाजपाचे उमेदवार देखील होते. पतीची राजकीय भूमिका पाहून हळूहळू तिनेही भाजपा जॉईंट केली. आता ती पक्षाच्या तिकीटावर पंचायत निवडणूकीच्या मैदानात उभ्या होत्या.

विरोधी उमेदवाराला आव्हान, परंतू….

युडीएफच्या विरोधी उमेदवार मंजुला रमेश यांच्यासाठी ही निवडणूक आता सामान्य राहिली नव्हती, कारण मतपत्रिकेवर “सोनिया गांधी (BJP)” हे नाव छापलेले पाहून अनेक मतदार बुचकळ्यात टाकले होते.. राजकारण अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. जेव्हा नावे सारखी असल्याने मतांची विभागणी झाली आहे. स्थानिक निवडणूकात हा फॅक्टर अधिक प्रभावी ठरण्याचा धोका असतो. मात्र, सोनिया गांधी हिला मुन्नार पंचायतीच्या १६ व्या वॉर्ड असलेल्या नल्लाथन्नी वॉर्डमधून निवडणूकीत केवल १०३ मते मिळाली, तिच्या विरोधात उभ्या असलेल्या युडीएफच्या उमेदवार मंजुला रमेश यांचा येथे विजय झाला.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.