Mallikarjun Kharge : थोडीशीही लाज असेल तर शहांचा राजीनामा घ्या – आक्रमक मल्लिकार्जुन खरगेंची मोदींकडे मागणी
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची विरोधकांनी तीव्र मागणी केली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, पॅलेट गन वापर आणि नंतर विद्यार्थ्यांवर सूडाने केलेल्या कारवाईवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आक्रमक झाले आहेत. आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवरून सरकार फिरल्याचा आरोप करत, थोडीही लाज शिल्लक असेल तर शहांचा राजीनामा घ्यावा, असे खरगे यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले आहे.

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता काँग्रेसचे अध्यक्ष, नेते मल्लिकार्जुन खर्गेही याच मागणीवरूवन आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांविरोधात “सूडाच्या भावनेने कारवाई” केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी X वर एक पोस्ट करत केली आहे. थोडीही लाज शिल्लक असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या, असं खर्रगे यांनी या पोस्टमधून सुनावलं आहे. त्यांच्या या ट्विवने खळबळ माजली आहे.
काय म्हणाले खरगे ?
मल्लिकार्जुन खरगे यांनी 20 जुलै रोजी दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या “बळाचा वापर” केल्याचा उल्लेख करत ‘एक्स’वर पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून त्यांनी हे ट्विट केलं आहे. दहा दिवसांपूर्वी सरकारने तरुणांवर “लाठी-काठ्या आणि पॅलेट गनचा वापर करून दडपशाही” केली, असं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले जात आहे, असा दावा पुढे खरगे यांनी केला.
“तरुणांनी आंदोलन या अटीवर मागे घेतले होते की त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, परंतु आता सरकारे स्वतःच्या शब्दावरून मागे फिरली आहेत.” असं खरगे म्हणाले. तरुणांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली जात आहेत आणि मुलींची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
गृहमंत्री अमित शाह संसदेत पाऊल ठेवू शकले नाहीत आणि जबाबदारीसंदर्भात निवेदन देण्यापासून ते दूर राहिले. आता “प्रतिमा वाचवण्याचे डावपेच चालणार नाहीत, तरुणांना तुमचे सत्य कळून चुकले आहे.” अस म्हणत “थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या.” असं खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटलं.
.@narendramodi जी,
10 दिन पहले, आपकी सरकार ने युवाओं का लाठी-डंडे-Pellet Gun से दमन किया।
जब छात्रों ने अपना आंदोलन वापस ले लिया तो अब आप बदले की भावना से उनपर FIR करवा रहें हैं, जबरन हिरासत में ले रहें हैं।
युवाओं ने आंदोलन इस शर्त पर वापिस लिया कि उनपर कार्रवाई नहीं होगी,…
— Mallikarjun Kharge (@kharge) July 31, 2026