भारतात कोणत्या राज्यात कोरोना लाट कधी येणार? आयआयटी संशोधकांच्या अहवालात मोठे खुलासे

आयआयटीच्या संशोधकांनी वैज्ञानिक आकडेवारी आणि माहितीच्या आधारे कोणत्या राज्यात कधी कोरोना लाट येणार याची माहिती दिलीय.

भारतात कोणत्या राज्यात कोरोना लाट कधी येणार? आयआयटी संशोधकांच्या अहवालात मोठे खुलासे
कोरोना


नवी दिल्ली : देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. काही ठिकाणी ही लाट ओसरली आहे, तर बरेच असेही राज्य आहेत जिथं अजून ही लाट आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना तयारी करण्यासाठी आधीच अंदाज यावा म्हणून आयआयटीच्या संशोधकांनी वैज्ञानिक आकडेवारी आणि माहितीच्या आधारे कोणत्या राज्यात कधी कोरोना लाट येणार याची माहिती दिलीय. मॅथेमेटिकल प्रोजेक्शनच्या आधारे केलेल्या या संशोधनात तामिळनाडू, पंजाब आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणे बाकी असल्याचं नमूद करत त्याची तारीखही सांगण्यात आलीय (Know When Corona wave will come in different states of India IIT Kanpur report).

आयआयटीच्या या संशोधकांनी कोरोनाच्या लाटांचा अंदाज लावण्यासाठी SUTRA नावाचं गणितीय मॉडेल तयार केलंय. यानुसार, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांमधील कोरोनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये कोरोनाची दुसरी लाट येणं बाकी आहे. या मॉडेलने वर्तवलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूत 29-31 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिल. पुडुचेरीत कोरोनाच्या लाटेचा उच्चांक 19 ते 20 मे दरम्यान येईल, तर आसाममध्ये 20-21 मे दरम्यान कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील.

कोणत्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट संपली?

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्किम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा राज्यातील कोरोनाची लाट ओसरलेली आहे. या राज्यांमध्ये हळूहळू कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार?

उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये देखील कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. यानुसार पंजाबमध्ये 22 मे तर हिमाचल प्रदेशमध्ये 24 मे रोजी सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय देशभरात मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसेल, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. तर जुलैच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट देशभरातून संपेल, असंही सांगण्यात आलंय.

भारतात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

या अभ्यास अहवालानुसार, पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यानंतर देशभरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढेल.

हेही वाचा :

मुलं आपली, जबाबदारी सर्वांची, कोरोनानं छत्र हरपलेल्या मुलांच्या मदतीसाठी ‘इथे’ करा संपर्क

कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

बापरे! अमरावतीत कोरोनाची तिसरी लाट, रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

व्हिडीओ पाहा :

Know When Corona wave will come in different states of India IIT Kanpur report

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI