AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahu Maharaj : राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना खासदार शाहू महाराजांचं उत्तर, काँग्रेसने तर..

Shahu Maharaj : कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनावरुन देशात मोठा गदारोळ सुरु आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं सुरु आहेत. नीट पेपर फुटीवरुन हे आंदोलन सुरु झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे.

Shahu Maharaj : राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना खासदार शाहू महाराजांचं उत्तर, काँग्रेसने तर..
Shahu Maharaj-Abhijeet Dipke
| Updated on: Jul 24, 2026 | 12:57 PM
Share

कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर येऊन सीजेपीच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराजांनी आपले विचार मांडले. “गेल्या काही वर्षातला कारभार आपण बघितला विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होतोय. आता तो ठराविक पॉइंटला येऊन पोहोचलाय. कुठल्याही अन्यायाविरोधात आपण आहोत. लढत राहिलं पाहिजे, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे” असं खासदार शाहू महाराज म्हणाले. मुंबईत सीजेपीचं समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. त्यावर शाहू महाराजांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात किती रोष आहे ते आपल्या लक्षात येतं’

राहुल गांधी, काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातय. त्यावर शाहू महाराज म्हणाले की, “विद्यार्थ्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यांनी मागणी सुद्धा केलीय की, मंत्रिमहोदयानी राजीनामा द्यावा” धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यावर शाहू महाराज म्हणाले की, ‘त्यांनी राजीनामा दिला तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील’

सरकार आणि सीजेपीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार

कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनावरुन देशात मोठा गदारोळ सुरु आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं सुरु आहेत. नीट पेपर फुटीवरुन हे आंदोलन सुरु झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. आज दुपारी दिल्लीतील नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये सरकार आणि सीजेपीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

बैठक निष्फळ ठरण्याची शक्यताच जास्त

कारण या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. पोलीस आणि विद्यार्थी दोघे जखमी झाले आहेत. सीजेपीने सरकारसोबत होणाऱ्या बैठकीआधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच हवा, त्यापेक्षा कमी काही नको अशी सीजेपीची भूमिका आहे. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरण्याची शक्यताच जास्त आहे.  उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा