AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव

प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोठी बातमी! प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव
| Updated on: Jan 19, 2025 | 5:02 PM
Share

प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे.

ही आग प्रयागराजमधील शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली आहे. हा सर्व परिसर महाकुंभ मेळा क्षेत्रात येतो. आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे कारण, त्या ठिकाणी तंबूमध्ये अनेक सिलिंडर ठेवण्यात आले आहेत, या सिलिंडरचा एका मागून एक असा स्फोट होत असल्यामुळे आग आधिकच भडकली आहे. अचानक आग लागल्यामुळे महाकुंभ मेळ्यावत चांगलाच गोंधळ उडाला असून, लोक सुरक्षित जागी स्थलांतर करत आहेत.

दरम्यान या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी हवा देखील अधिक वेगानं वाहत आहे, त्यामुळे आग अधिकच भडकली आहे. त्यातच तंबूत ठेवलेल्या सिलिंडरचा एका मागून एक स्फोट होत असल्यानं आग पसरण्याचा धोका आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आहे.

Follow Us
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!