AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कूनोतून Good News ! नामीबियाहून आलेल्या ज्वाला चित्ताने 3 बछड्यांना दिला जन्म

नामिबियातून आणलेल्या आणि मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेल्या चित्त्यांचे कुटुंब हळूहळू वाढू लागले आहे. सिया आणि आशा यांच्यानंतर तिसरी मादी चित्ता ज्वालाने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.

कूनोतून Good News ! नामीबियाहून आलेल्या ज्वाला चित्ताने 3 बछड्यांना दिला जन्म
| Updated on: Jan 23, 2024 | 12:18 PM
Share

भोपाळ | 23 जानेवारी 2024 : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब वाढू लागले आहे. ज्वाला या चित्ता मादीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त होत होती. 16 जानेवारीला याच पार्कमध्ये ‘शौर्य’ चित्त्याचे निधन झाले होते. मात्र आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला असून आता कुनोमध्ये अजून 3 चिमुकले चित्ते आल्याने आनंदाचं वातावरण पसरलं आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या तिन्ही पिल्लांच्या जन्माने पिल्लू आणि पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचेही यादव यांनी नमूद केले त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून त्यांनी ही ‘गुड न्यूज’ शेअर केली आहे. ‘कुनोचे नवीन शावक’असे त्यांनी लिहील आहे. नामिबियातील चित्ता ज्वालाने तीन शावकांना जन्म दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये याआधी आणखी एका चित्ता, आशा हिनेही  गुड न्यूज दिली होती.  आशा या मादीने यावर्षी ३ जानेवारी रोजी आनंदाची बातमी दिली होती, तिने एकाच वेळी तीन पिल्लांना जन्म दिला. यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये आघाडीवर काम करणाऱ्या वन्यजीव वॉरियर्सचे अभिनंदन केले. देशभरातील वन्यजीवप्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतातील वन्यजीवांच्या समृद्धीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कूनोमध्ये नव्या पाहुण्यांचे स्वागत

तर त्याआधी सिया नावाच्या चित्ता मादीने गेल्या वर्षी मार्चमध्ये 4 बछड्यांना जन्म दिला होता. मात्र, सियाच्या बछड्यांपैकी अवघा एकच चित्ता आता जिवंत आहे. उर्वरित तिघांचा अकाली मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेमुळेच देशात चित्ते परतले असून आज मध्य प्रदेश चित्त्यांचे राज्य बनण्यात यशस्वी ठरले आहे.

प्रोजेक्ट चीता अंतर्गत गेल्या वर्षी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बिबट्यांना कुनोच्या जंगलात सोडले होते. पूर्वी हा परिसर फक्त चित्त्यांसाठी ओळखला जायचा, पण कालांतराने भारतीय भूमीतून चित्ते नामशेष होऊ लागले. अशा स्थितीत प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत या नामशेष होणाऱ्या मांसाहारी प्रजातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आठ चित्त्यांनंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांच्या नवी बॅचही आणण्यात आली होती. या बिबट्यांनाही कूनोतील जंगलात सोडण्यात आले आहे. मात्र, या काळात काही चित्त्यांचा मृत्यूही झाला आहे. यानंतर या प्रकल्पावर  बरीच टीका झाली. यातील काही चित्ते जंगलात सोडण्याचा प्रयत्न झाला, पण या चित्त्यांनी कुनोची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना परत आणण्यात आले.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नामिबियन चित्ता ‘आशा’ने तीन बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर आता ज्वालाने देखील तीन बछड्यांना जन्म दिल्यामुळे या प्रकल्पाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहीले जात आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.