AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 20 मिनिटांत अब्जाधीश झाला, लगेच नशीब असं फिरलं की घरात खायलाही काही उरलं नाही; असं काय घडलं त्या भारतीय माणसाबाबत?

20 मिनिटांत अब्जाधीश झाला आणि पुढे असं काही घडलं की, आज त्याच्याकडे खायला देखील पैसे नाहीत..., सकाळी उठल्यानंतर पुढच्या काही क्षणात असं काही घडलं की..., सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा...

अवघ्या 20 मिनिटांत अब्जाधीश झाला, लगेच नशीब असं फिरलं की घरात खायलाही काही उरलं नाही; असं काय घडलं त्या भारतीय माणसाबाबत?
जितेंद्र साह
| Updated on: Dec 09, 2025 | 3:13 PM
Share

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही… एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक 36 वर्षांचा पुरुष उठतो आणि रोजप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात. पत्नी म्हणते, घरात अन्न आणि पाणी पूर्णपणे संपलं आहे…. काही तरी आणी ज्यामुळे जेवण बनवता येईल… यावर पती म्हणतो, “तुला माहिती आहे गेल्या आठवड्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. माझ्या खिशात एक पैसा नाही.”

यावर पत्नी म्हणाते, “एक काम करा सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट तपासा. त्यात काही पैसे असतील. ते काढा आणि रेशन घ्या.” पत्नीने सांगितल्यानंतर पती बँकेत जातो आणि बँक कर्मचाऱ्याने खात्यात किती पैसे आहेत, हे पाहण्यासाठी सांगतो आणि म्हणतो, 500 असतील तर, 200 द्या आणि 400 असतील तर 200 द्या… कर्मचाऱ्याने पाहिलं आणि सांगितलं…600 कोटी आहेत… यावर बँक कर्मचारी देखील थक्क झाला आणि पुरुष देखील हैराण झाला…

संबंधित घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे… खात्यात 600 कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या 20 मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं…

बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे आणि ते तपास करत आहेत. गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे. जितेंद्र म्हणाला, ‘गेल्या आठवड्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. मी पैसे काढू शकलो नाही. पैशाची आधीच समस्या आहे, पण आता मला खटला भरण्याची चिंता आहे. पोलिसांनी मला ताब्यात घेतलं तर, मला माहिती देखील नाही की, एवढी मोठी रक्कम आली कशी…’ मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Follow Us
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
शरणागती पत्करा, नाहीतर... ; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?.
संजय केणेकरांचा दुबईत अडकलेल्या भारतीयांशी फोनवरुन संवाद
संजय केणेकरांचा दुबईत अडकलेल्या भारतीयांशी फोनवरुन संवाद.
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....