AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ राज्यात दारुवर कोविड सेस; तळीरामांना मोजावी लागणार एवढी किंमत

उत्तर प्रदेश सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)

'या' राज्यात दारुवर कोविड सेस; तळीरामांना मोजावी लागणार एवढी किंमत
Liquor (फोटो प्रातनिधिक)
| Updated on: May 04, 2021 | 12:44 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दारुवर सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांना आता दारुवर 10 ते 40 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अबकारी धोरणात बदल करून हे शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे प्रति 90 ml दारुवर तळीरामांना आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत.(liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)

कोविड सेसच्या माध्यमातून सरकारला राज्याचा महसूल वाढवायचा आहे. त्यातून होणाऱ्या मिळकतीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यास उपयोग होणार आहे. याबाबतचा शासन आदेश कालच सोमवारी जारी करण्यात आला आहे. दारुचे भाव वाढल्याने तळीरामांना मात्र फटका बसला आहे.

किती भाव वाढणार?

उत्तर प्रदेशात दारुवर कोविड सेस आकारल्या गेल्याने दारुच्या किंमतीत 10 ते 40 रुपयांची वाढ होणार आहे. प्रिमीयम कॅटेगिरीच्या दारुवर प्रति 90ml ला दहा रुपये मोजावे लागणार आहेत. सुपर प्रिमीयमवरील प्रति 90ml वर 20 रुपये आणि स्कॉचवरील प्रति 90 ml वर 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय इंपोर्टेड दारुवरील प्रति 90ml वर 40 रुपये कोविड सेस आकारला जाणार आहे.

दुसऱ्यांदा वाढ

यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने 1 एप्रिल रोजी दारुचे दर वाढवले होते. यूपी सरकारने स्कॉच, वाईन, व्हिस्की आणि व्होडका सहीत सर्व दारुंवरील परमिट शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात विदेशी दारुंच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर बियरच्या किंमती 10 ते 20 रुपयांनी कमी झाल्या होत्या.  (liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)

संबंधित बातम्या:

याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यायचंच आहे; भाजपच्या खासदाराची धमकी

बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी

(liquor price goes up in uttar pradesh due to covid cess)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली