AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, किती टप्प्यात होणार मतदान

lok sabha election 2024 declaration | शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुका उद्या दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर आचरसंहिता लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, किती टप्प्यात होणार मतदान
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 15, 2024 | 1:54 PM
Share

नवी दिल्ली | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी 3 वाजता आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशभरात सात किंवा आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान एकूण सात टप्प्यात झाले होते. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागले होते.

काय आहे आदर्श आचारसंहिता

  • निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा होत असतानाच आदर्श आचारसंहिता लागू होते. त्यानंतर आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असते.
  • लोकसभा निवडणुकीमुळे आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे.
  • आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेली नाही. सर्वच राजकीय पक्षांची मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन तयार केली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदलही होत असतात.
  • देशात पहिली आचारसंहिता 1960 मध्ये झाली होती. केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती.

असे कारणे आचारसंहितेचे उल्लंघन

निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही.तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई

एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग फौजदारी खटला दाखल करु शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून थांबवू शकतो. आचारसंहितेच्या उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्या तुरुंगवासाची शिक्षा होते. या काळात मतदारांवर दबाब आणणे, त्यांना धमक्या देणे ही बाबी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष