निवडणूक आयोगाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबाबत महत्वाचा निर्णय, आचारसंहिता कधीपासून…

lok sabha election 2024 declaration | शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. ही बैठक 40 मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला.

निवडणूक आयोगाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबाबत महत्वाचा निर्णय, आचारसंहिता कधीपासून...
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 1:56 PM

नवी दिल्ली | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते. या दोघांची नियुक्ती गुरुवारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. ही बैठक 40 मिनिटे चालली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. त्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला. आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवारी 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.

महाराष्ट्रात किती टप्प्यात निवडणूक

लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान सात ते आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या १६ मार्च रोजी पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये सात टप्प्यात मतदान

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाले होते. त्यावेळी वेळी निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात 91 कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी 67 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये निकाल काय होते

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर NDA ला 45% मते मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.