LPG Cylinder Price : घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ, कंपन्यांकडून दर जाहीर

विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती.

LPG Cylinder Price : घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ, कंपन्यांकडून दर जाहीर
ही कागदपत्र आहेत आवश्यक - बीपीएल कार्ड (BPL), बीपीएल (BPL) रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, नेम प्रिंट आऊट

मुंबई : LPG सबसिडीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला घरगुती गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती. आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडर 694 रुपयांना मिळत होता. पण आता पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.(Rise in the price of domestic gas cylinders)

14 फेब्रुवारीला रात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर नव्या दरात उपलब्ध होणार आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपये असणार आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची घोषणा करत असते. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत.

अर्थसंकल्पादिवशी कमर्शियल गॅस महागला

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.

महिन्याला किमतीची समिक्षा

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

एलपीजी किंमत कशी तपासायची?

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

संबंधित बातम्या :

LPG Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या किंमत…

आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

Rise in the price of domestic gas cylinders

Published On - 9:23 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI