AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Prices: घरगुती ते कमर्शियल.. एलपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या.. किती महाग?

LPG Cylinder Prices: एलपीजी सिलेंडरच्या किंमती काही प्रमाणत जरी वाढल्या तरी, सर्वसामान्य जनतेच्या खिश्यावरचं ओझं आणखी वाढतं तर, महिलांचं महिन्याचं गणित चुकतं... अशात सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहे. जाणून घ्या सिलेंडरचे दर...

LPG Cylinder Prices: घरगुती ते कमर्शियल.. एलपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या.. किती महाग?
LPG Cylinder
| Updated on: May 07, 2026 | 11:24 AM
Share

LPG Cylinder Prices: पूर्वी चुलीवर जेवण बनवलं जायचं, पण आता प्रत्येकाच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडर आहे. सांगायचं झालं तर, देशात सिलेंडरचे प्रकार देखील वेगवेगळे आहे… ज्यांचे ताजे रेट्स जाहिर करण्यात आले आहे. घरगुती वापराच्या सिलेंडर पासून, मोठे हॉटेल उद्योजक वापरत असलेल्या सिलेंडरचे दर समोर आले आहे. प्रत्येक सिलेंडरचा प्रकार वेगळा असतो आणि त्यांच्या किंमती देखील वेगवेह्या असतात. तर जाणून घ्या कोणता सिलेंडर कोणत्या कामासाठी असतो आणि त्या सिलेंडरचे दर काय आहेत.

घरगुती LPG सिलेंडर

14.2 किलो वजनाचा सिलेंडर सर्वात जास्त घरांमध्ये वापरला जातो. अनेक घरांमध्ये याच वजनाच्या सिलेंडरचा वापर केला जातो… आजच्या दरांबद्दल सांगायचं झालं तर, आज 14.2 किलो वजनाच्या सेलिंडरचे दर जवळपास 913 रुपये आहे. तर छोट्या कुटुंबियांसाठी किंवी तात्पूरत्या उपयोगासाठी 5 किलोग्रॅमच्या सिलेंडरचा वापर केला जातो… ज्यांची किंमत 339 रुपये आहे.

XTRALITE सिलेंडर : हलका आणि आधुनिक पर्याय…

XTRALITE सिलेंडर हे आधुनिक तंत्रांपासून तयार करण्यात आलेले सिलेंडर आहेत. हे सिलेंडर प्रचंड हलके असतात. तर 10 किलोग्रॅम XTRALITE सिलेंडरची किंमत 652.5 आहे. तर वेगवेगळ्या प्रकारात हे सिलेंडर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 339 ते 826 रुपयांपर्यंत आहे. हे सिलेंडर वजनाने हलके असून सहजरित्या उचलता येण्यासारखे आहे… यामध्ये गॅस लेव्हल देखील दिसते..

कमर्शियल सिलेंडर – हॉटेल आणि दुकानांसाठी महागडे सिलेंडर

हॉटेल, ढाबा किंवा रेस्टोरेंटमध्ये वापरण्यात येणारे सिलेंडर 19 किलोग्रॅमचे कमर्शियल सिलेंडर असतात. कमर्शियल सिलेंडरच्या किंमती 3 हजार 71 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.. तर Nanocut आणि XtraTej यांसारख्या हाय एफिशिएंसी सिलेंडरच्या किंमती 3 हजार 94 रुपयांपासून 3 हजार 225 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. या सिलेंडरच्या किंमती घरगुती सिलेंडरच्या किंमतींपेक्षा अधिक आहेत.

मोठ्या उद्योगांसाठी अधिक क्षमता असलेले सिलेंडर

47.5 किलोग्रॅम वजनाचे सिलेंडर, जे मोठ्या हॉटेल किंवा इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. या सिलेंडरची किंमत जवळपास 7 हजार 674 रुपये ते 7 हजार 730 पर्यंत असते. हे सिलेंडर मोठ्या प्रमाणावर चालतात आणि अनेक गरजा देखील पूर्ण केल्या जातात.

इंडस्ट्रियल बल्क सिलेंडर

सर्वात मोठ्या म्हणजेच 425 किलोग्रॅम इंडस्ट्रीयल सिलेंडरच्या किंमती 68 हजार 707 रुपये ते 69 हजार 209 रुपयांपर्यंत असतात. या सिलेंडरचा उपयोग मोठे व्यवसाय आणि कारखाण्यांमध्ये केला जातो…

Non – Domestic सिलेंडर

5 किलोग्रॅमच्या नॉन-डोमेस्टिक सिलेंडरच्या किंमती 810 रुपयांपासून सुरु होतात. तर 1 हजार 754 पासून 1 हजार 770 रुपयांपर्यंत असते. या सिलेंडरचा वापर दुकानांमध्ये आणि छोट्या उद्योजकांसाठी होतो.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...