AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय…

LPG New Rule: सरकारने एलपीजी युजर्ससाठी १ जूनपासून 'एक घर, एक गॅस कनेक्शन' चा रुल लागू करण्यात आला आहे.याच्या अंतर्गत पीएनजी कनेक्शन असणाऱ्या लोकांना त्यांची एलपीजी कनेक्शन सरेंडर करावा लागणार आहे.

LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय...
LPG New Rule
| Updated on: Jun 04, 2026 | 5:15 PM
Share

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सुरु झालेल्या एलपीजीच्या टंचाईला दूर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने अलिकडेच एक घर एक गॅस कनेक्शनचा (One Household On Gas Connection) नियम देखील आणला आहे. सरकारच्या या नव्या LPG Rule ने गॅस ग्राहकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे. परंतू सर्वांना चिंता करण्याची गरज नाही, या अटींवर तुम्हाला तुमचा LPG Cylinder सरेंडर करण्याची गरज नाही. कोणत्या या अटी त्या पाहूयात..

काय आहे ‘एक घर एक गॅस कनेक्शन’चा नियम काय ?

सरकारच्या नियमानुसार जर एखाद्या एलपीजी उपयोगकर्ताच्या घरात पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG कनेक्शन असेल तर त्यांना आपला LPG Cylinder सरेंडर करावा लागणार आहे. यासाठी सरकारने पीएनजी कनेक्शनपासून ३० दिवसाची डेडलाईन सेट केली आहे. जर या कार्यकालात सिलेंडरला सरेंडर केला नाही, तर इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस सिलिंडरचे कनेक्शन कॅन्सल केले जाणार आहे.

वास्तविक ज्या कुटुंबाकडे आधीच पीएनजी कनेक्श आहेत आणि त्यासोबत त्यांनी एलपीजी कनेक्शन देखील सुरु ठेवले असेल तर त्यांच्यासाठी हा सरकारी नियम आणला आहे. एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन एक साथ बाळगणे सुधारित गॅस नियंत्रण आदेशाचे उल्लंघन आहे.

सरकारच्या आदेशानंतर आईल मार्केटिंग कंपन्या देखील एक्शन मोडमध्ये आहेत आणि एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन डेटाबेसचा तपासणी केली जात आहे. आणि दुहेरी कनेक्शनच्या ग्राहकांची पडताळणी केली जात आहे.

ट्रान्सफर व्हाऊचरचा मिळतो पर्याय

जर तुमच्याकडे LPG-PNG दोन्ही कनेक्शन आहे, तर तुमचे पीएनजी कनेक्शन कनेक्शनच्या सक्रीय होण्याच्या ३० दिवसांच्या आत एक तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करायला हवे वा पुन्हा ट्रान्सफर वाऊचर प्राप्त करण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहेत. ट्रान्सफर व्हाऊचर तुम्हाला गैर- पीएनजी क्षेत्रात ट्रान्सफर झाल्यानंतर स्वत:चा एलपीजी कनेक्शन पुन्हा प्राप्त करण्याची परवानगी देतो.

या कंडीशनमध्ये एलपीजी सरेंडर करावे लागणार नाही

एलपीजी आणि पीएनजी दोन्ही कनेक्शन असण्याचा हा अर्थ नाही की तुमची एलपीजी कनेक्शन लागलीच रद्द केले जाईल. जर तुमच्या शहरातील गॅस पुरवठादार हे प्रमाणित करत असेल की संरचनात्मक, सुरक्षा आणि पायाभूत ढाच्या संबंधित अडचणींमुळे तुमच्या क्षेत्रात पीएनजी पुरवठा तांत्रिक रुपाने करणे शक्य नाही होत नाहीए तर अशी कुटुंबे एलपीजीचा उपयोग सुरु ठेवू शकतात.

या शिवाय असे एलपीजी युजर, ज्यांना अधिकृत कमर्शियल उद्देश्यांसाठी एलपीजीची आवश्यकता असते, त्यांना देखील त्यांची एलपीजी सिलिंडर परत जमा करण्याची गरज नाही.

तुमचा LPG पुरवठा केव्हा बंद होईल ?

हे जाणून घेणे महत्वाचे आहे की तुमचा एलपीजी पुरवठा केव्हा रद्द केला जाऊ शकतो. जर तुमच्या क्षेत्रात पीएनजी पाईपलाईन उपलब्ध आहे आणि तुम्ही नोटिस कालावधी दिल्यानंतही तुमच्या एलपीजीला कनेक्शनला बंद केले नाही. तर एलपीजी पुरवठा बंद केला जाऊ शकतो. तसेच ज्या घरात पीएनजी पाईपलाईन सक्रीय आहे. त्यांना घरगुती एलपीजी सिलिंडर बुक करण्याच्या वा रिफिल करण्यापासून रोखले जाऊ शकते.

Follow Us
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
Sunil Tatkare | शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध, अनिकेत तटकरे होणार आमदार!
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने...
भाजपाला सर्वात मोठा धक्का, गोकुळ गीतेंची माघार नाहीच, बाप काढल्याने नाशकात संघर्ष अटळ!
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज माग
ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!
उमेदवारी मागे घेताच ठाकरेंचा दणका; बाळ मानेंची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी
भाजपवर हल्लाबोल अन्.... सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत खळबळ
Vidhan Parishad Election | भाजपवर हल्लाबोल अन् आता मंत्रीपदावर दावा; सत्तारांच्या त्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा खळबळ
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन्
कोकणात ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका! गळाभेट, जिल्हाधीकारी कार्यालय अन् नितेश राणेंनी टप्प्यात केला कार्यक्रम
महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा
पुढच्या एक वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील; राहुल गांधींचा खळबळजनक दावा