AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucknow murder : बायको दीड कोटी पोटगी मागत होती, म्हणून तिच्यावर बँकेबाहेर झाडल्या गोळ्या

लखनऊमध्ये मानसने पत्नी दिव्या आणि बहीण शीबा यांची हत्या करून स्वतःचं आयुष्य संपवल्याने शहर हादरलं. घटस्फोटात पत्नीने दीड कोटी पोटगीची केलेली मागणी हे या हत्याकांडामागचं कारण असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवस रेकी करून, तीन शस्त्रं विकत घेऊन मानसने ही भयानक योजना आखली, ज्यामुळे एका कुटुंबाचा करुण अंत झाला.

Lucknow murder  : बायको दीड कोटी पोटगी मागत होती, म्हणून तिच्यावर बँकेबाहेर झाडल्या गोळ्या
Lucknow double murder case
| Updated on: Aug 21, 2026 | 10:00 PM
Share

2 दिवस रेकी, 30 मिनिटांत 2 हत्या आणि आत्महत्या ! लखनऊमध्ये झालेल्या भयानक हत्याकांडाने (Lucknow crime) अख्खं शहर हादरलं. मानस नावाच्या इसमाने बँकेबाहेर आधी त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली, नंतर त्याने त्याच्या बहिणीला संपवलं आणि अखेर स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 2 कारणं समोर आली आहेत. पहिलं म्हणजे – जिची हत्या झाली ती बँक मॅनेजर दिव्या मिश्रा हिने घटस्फोटासाठी SBI अधिकारी मानस याच्याकडून दीड कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, आणि दुसरं कारण म्हणजे – मानस याची बहीण शीबा मानसिक आजाराने ग्रस्त होती, तिच्यासोबत रहायला दिव्या तयार नव्हती..

18 ऑगस्ट रोजी फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी होती. या दरम्यान मानस आणि दिव्या या दोघांमध्ये पोटगीच्या मुद्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर मानस एवढा त्रासला होता, वैतागला होता की त्याने पत्नी आणि बहिणीला मारण्याची आणि आत्महत्या करण्याची योजना आखली, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. त्यासाठी त्याने 3 शस्त्रं खरेदी केली आणि तब्बल 2 दिवस पत्नीची रेकीही केली, असं उघड झालं.

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्या दिवशी ( गुरूवार) दुपारी 12 वाजता मानस हा रिक्षात बसून त्याची पत्नी दिव्या हिच्या ICICI बँकेत पोहोचला. तिथेआधी दोघांमध्ये बराच वाद झाला, मारामारीही झाली, त्यानंतर मानसने दिव्यावर सटासट दोन गोळ्या झाडल्या. बँकेच्या बाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संपूर्ण हत्याकांड रेकॉर्डही झालं. त्यानंतर तो रिक्षात बसून तिथून फरार झाला. घामाघूम झालेला मानस कसाबसा घरी पोहोचला. घरी जाऊन त्याने दार लावून घेतलं, टीव्हीवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली आणि त्यानंतर त्याने त्याची बहीण शीबा हिच्या डोक्यात गोळी झाडली. एवढंच नव्हे तर पत्नी आणि बहिणीला मारल्यानंतर मानसने स्वत:वर गोळी झाडून घेत आपलं आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसची पत्नी दिव्या ही यूट्यूबर प्रज्ञा मिश्रा यांची बहीण होती.  माझा मेहुणा मानस हा सायको होता असा आरोप प्रज्ञाने केला आहे. त्यामुळे मी त्याच्यापासून दूर रहायचे, असंही तिने सांगितलं.  मानस आणि दिव्याने 9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र वर्षागणिक त्यांच्यातील प्रेमाचं रूपांतर इतक्या द्वेषात झालं की मानसने संपूर्ण कुटुंबच संपवलं.

9 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, 1 वर्षापूर्वी पत्नीने सोडलं घर

नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, मानस आणि दिव्याने 2017 साली प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांचे संबंध चांगले होते. मात्र नंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद होऊ लागले.  हळूहळू दोघांमधील दुरावा वाढत गेला आणि ते वेगवेगळे राहू लागले. 2018 मध्ये मानसच्या आईला कॅन्सर झाल्यानंतर दिव्या पुन्हा त्याच्यासोबत राहू लागली. याच काळात मानसच्या बहिणीला, शीबा हिला सोबत ठेवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. 2019 मध्ये मानसच्या आईचे निधन झाल्यानंतर दिव्या पुन्हा वेगळी राहू लागली. काही काळानंतर दोघांमध्ये पुन्हा संवाद झाला आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले.

पण 2025 साली बहिणीच्या मुद्द्यावरून दोघांमधील वाद पुन्हा वाढला. मी मानसच्या बहिणीसोबत राहणार नाही, असं दिव्याचं म्हणणं होतं, पण मानस यासाठी तयार नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये दिव्याने ते घर कायमचं सोडलं.  मानसने हे नातं वाचवण्याचा बराच प्रयत्न केला आणि दिव्याशी अनेक वेळा चर्चा केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यानंतर हे प्रकरण लखनऊ फॅमिली कोर्टात पोहोचलं. जानेवारी 2026 मध्ये दिव्याने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली आणि घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली.

विकत घेतली 3 शस्त्रं आणि रेकीलाही सुरूवात

मानसच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो सुमारे 3 महिन्यांपासून बँकेच्या ऑडिटच्या कामानिमित्त शहराबाहेर होता. मात्र परत येताच त्याला कोर्टातील 18 तारखेच्या सुनावणीबद्दल समजलं. तो कोर्टात गेला, पत्नीने दीड कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचं तिथे मानसला समजलं. मात्र त्यामुळे तो खूप तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं.

18 ऑगस्टच्या सुनावणीनंतर मानसने पत्नी आणि बहिणीला मारण्याची आणि आत्महत्येची योजना आखली. त्यासाठी त्याने 2 दिवसांत 3 शस्त्र खरेदी केली. पोलिसांनी ती तीनही हत्यारं जप्त केलीत, ती लोडेड होती. मात्र मानसने ती शस्त्रं नक्की कुठून विकत घेतली, त्याचा अद्याप तपास सुरू आहे.

पत्नीला इशाऱ्याने बोलावलं, मारहाण करून झाडली गोळी

दिव्याचा मामेभाऊ मयंक दीक्षितच्या सांगण्यानुसार, 20 ऑगस्ट रोजी दिव्या बँकेच्या कामासाठी बाहेर गेली होती. काम संपवून जेव्हा ती दुपारी कारने ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा मानस आधीच तिथे होता. त्याने दिव्याला इशारा करून बोलावले , काही बोलायचं आहे, असं त्याने सांगितलं. मात्र दिव्या त्याच्याजवळ पोहोचताच मानसने तिच्यावर हल्ला केला, मारहाण केली. बँकेचे रक्षक आणि कर्मचारी तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र याचदरम्यान संधी साधून मानसने दिव्याच्या कपाळावर गोळी झाडली. गोळी .लागताच दिव्या रस्त्यावर कोसळली. यानंतर मानस तेथून पळून गेला, पुढे त्याने बहिणीला आणि स्वत:लाही संपवलं.

पत्नीने मला फसवलं – आत्महत्या करण्याआधी अपलोड केलं स्टेटस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीची हत्या केल्यानंतर मानसने व्हॉट्सॲप स्टेटस अपलोड करत पत्नीवर फसवणुकीचा आरोप लावला. तसंच बहिणीला मारण्याचा आणि आत्महत्येचाही त्याने उल्लेख केला. या स्टेटस मध्ये त्याने दिव्याची बहिण प्रज्ञा आणि तिचा पती  यांचाही उल्लेख केला.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा