Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराणी अबक्का साहसी शासिका होत्या; दत्तात्रय होसबळे यांच्याकडून गौरवोद्गार

महाराणी अबक्का यांचा 500 वा जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या अनमोल योगदानाचा गौरव केला. उल्लाळा संस्थानाच्या कुशल शासिका, अजेय रणनीतिकार आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या लढ्यातील वीरांगना म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेने आणि सर्वसमावेशक शासनाने त्यांना "अभयाराणी" हे प्रतीक मिळाले.

महाराणी अबक्का साहसी शासिका होत्या; दत्तात्रय होसबळे यांच्याकडून गौरवोद्गार
Maharani Abbakka ChowtaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 12:57 PM

महाराणी अबक्का या भारताच्या महान स्वातंत्र्य सेनानी होत्या. त्या उत्कृष्ट आणि साहसी शासिका होत्या. अजेय रणनीतीकार होत्या. त्यांनी कर्नाटकातील उल्लाळा संस्थानचे उत्कृष्टपणे शासकत्व सांभाळले, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसबळे यांनी काढले. महाराणी अबक्का यांच्या 500 व्या जयंतीनिमित्ताने ते बोलत होते. एक पत्रकार परिषद घेऊन होसबळे यांनी या महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.

महाराणी अबक्का या भारताच्या महान स्त्री स्वातंत्र्य सेनानी, एक कुशल प्रशासक, अजेय रणनीतिकार आणि अत्यंत साहसी शासिका होत्या. त्यांनी आजच्या कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाळा संस्थानाचे यशस्वीपणे शासकत्व केलं. त्यांच्या 500 व्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या अपराजित वारशाचा सन्मान करतो, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

पोर्तुगीजांचा पाडाव

महाराणी अबक्का यांच्या राजवटीत त्यांनी पोर्तुगालीन हल्लेखोरांना अनेक वेळा पराभूत केले. त्याकाळातील पोर्तुगालीन सैन्य हे जगातील अत्यंत शक्तिशाली सैन्य मानले जात होते. त्यामुळे महाराणींच्या राज्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण झाले. त्यांची कूटनीतिक बुद्धिमत्ता आणि झमोरिन राजाशी केलेला सामंजस्य करार यामुळे ती हा पराक्रम कायम राखू शकली. त्यांच्या रणनीती, शौर्य आणि निर्भय नेतृत्वामुळे त्यांना “अभयाराणी” (निर्भय राणी) म्हणूनही गौरविण्यात आलंय, असंही होसबळे यांनी सांगितलं.

सर्वसमावेशकतेचं उदाहरण दिलं

महाराणी अबक्का यांनी भारताच्या समावेशक परंपरेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. यात त्यांनी विविध शिव मंदिरे आणि तीर्थस्थळे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या राज्यकाळात, सर्व धार्मिक समुदायांना समान सन्मान दिला गेला आणि विविध सामाजिक घटकांच्या समग्र विकासासाठी त्या कटिबद्ध होत्या. त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी कर्नाटकमध्ये आजही यक्षगान, लोकगीत आणि पारंपारिक नृत्यांद्वारे जिवंत राहतात, असंही त्या म्हणाल्या.

पोस्टल तिकीट जारी

त्यांच्या अपूर्व शौर्य, राष्ट्र व धर्माप्रति समर्पण, आणि प्रभावी शासकत्वाचा गौरव म्हणून भारत सरकारने 2003 मध्ये त्यांच्या नावाने एक पोस्टल तिकीट जारी केले. त्यामुळे त्यांच्या शौर्यकथा संपूर्ण देशभर गेल्या. त्याचप्रमाणे, 2009 मध्ये एक गस्ती जहाज त्यांच्या नावाने ठेवण्यात आले, ते त्यांच्या नौदल कंबिंगच्या वारशाचं आदर्श प्रतीक बनले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्र निर्माणाच्या मोहिमेत सहभागी व्हा

महाराणी अबक्कांची जीवनगाथा संपूर्ण देशासाठी एक अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांच्या 500 व्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अद्वितीय व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण समाजाला तिच्या गौरवमयी जीवनापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणाच्या सुरू मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलंय.

मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?
मुंबईतील जैन मंदिरावर पालिकेचा हातोडा, जैन समाज आक्रमक, मागणी काय?.
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले
'बोलता येईना, डोळे वाकडे'; बाबासाहेब पाटलांच्या विधानावर मुंडे म्हणाले.
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.