AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात घातपाताचा कट, संशयित अतिरेक्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र ATS इंदूरमध्ये

हाँगकाँग, पाकिस्तान-अफगाण सीमा आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईत दाखल झालेला सरफराज मेमन देशात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखली होती, असे एनआयएने म्हटले आहे.

देशात घातपाताचा कट, संशयित अतिरेक्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र ATS इंदूरमध्ये
दहशतवादीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Feb 28, 2023 | 11:19 AM
Share

इंदूर : देशात दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना होती. यासंदर्भात एक संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. या अतिरेक्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसची टीम इंदूरमध्ये दाखल झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या  (National Investigation Agency) सूचनेनंतर इंदूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गोपनीय अहवालाच्या आधारावर (Confidential Report) त्याला अटक केली आहे. त्या संशयित दहशतवाद्याचे नाव सरफराज मेमन (Sarfaraz Memon) आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी याला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानात प्रशिक्षणाची संशय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराजने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमधून प्रशिक्षण घेतले आहे. तो भारतात मोठ्या हल्ल्याची योजना तयार करत होतो, असे एनआयएच्या अहवालात म्हटले आहे. प्राथमिक चौकशीत सर्फराजने पोलिसांना सांगितले आहे की, तो 12 वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहत आहे. एनआयएने त्याचे नाव कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अद्याप जोडलेले नाही. या संशयित अतिरेक्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे. एनआयएने यासंदर्भात महाराष्ट्र एटीएसला अर्लट केले होते.

NIA कडून मुंबई पोलिसांना ईमेल

संशयित सरफराज मेमन, ज्याच्या संदर्भात NIA ने मुंबई पोलिसांना ईमेल केले होते. आता त्याला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदूरच्या चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये सध्या तो आहे.

देशात हल्ल्याची योजना

हाँगकाँग, पाकिस्तान-अफगाण सीमा आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईत दाखल झालेला सरफराज मेमन देशात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखली होती, असे एनआयएने म्हटले आहे. यामुळे सर्फराज मेमनला अटक झाल्यानंतर मुंबई पोलीस पोहचली आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना दिलेल्या ईमेलमध्ये सरफराज मेमनचे वर्णन भारतासाठी ‘धोकादायक’ असे के आहे.

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

सर्फराजचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टही मुंबई पोलिसांना मेल केले. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिसांसोबत संयुक्त तपास सुरू केला होता. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर इंदूर पोलिसांनीही याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि रात्री उशिरा त्याला पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराज मेमन मोठा हल्ला करण्याच्या इराद्याने देशात फिरत होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.