AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? देशात कुठे कोण झाले राज्यपाल, पाहा

रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले 'झारखंड वित्त विधेयक-2022' दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? देशात कुठे कोण झाले राज्यपाल, पाहा
| Updated on: Feb 12, 2023 | 10:31 AM
Share

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे . रमेश बैस (ramesh bais)यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होतो. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

कोण आहेत रमेश बैस

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

नगरसेवक- ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास

  • 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक
  • 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य
  • 1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री
  • 1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला
  • छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. ते सात वेळा खासदार झाले.
  • मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
  • ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
  • सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  • जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
  • जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय
  • 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल
  • 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.

१३ राज्यपाल बदलले

  • रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
  • लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
  • लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
  • सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
  • शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
  • गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
  • निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
  • बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
  • अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
  • एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
  • फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
  • ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

भगतसिंह यांना का बदलले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.