AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Rapid Railway : देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना; परिसरात पसरली एकच घबराट

दिल्ली-मेरठ कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 50 टन सिमेंट आणले जात होते. त्याचवेळी वायर तुटून सिमेंटचा भलामोठा भाग रस्त्यावर पडला. हा भाग थोडासा जरा बाहेर आला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये हा अपघात झाला. देशातील पहिली रॅपिड ट्रेन 14 मे रोजी गाझियाबादला येणार आहे.

Delhi Rapid Railway : देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना; परिसरात पसरली एकच घबराट
देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटनाImage Credit source: tv9
| Updated on: May 11, 2022 | 2:13 AM
Share

नवी दिल्ली : देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्प (Rapid Railway Project) दिल्ली-मेरठ कॉरिडॉरला मंगळवारी मोठा अपघात (Accident) झाला. मंगळवारी दुपारी सुमारे 50 टन वजनाचा सिमेंटचा भाग क्रेनमधून पडला. सुमारे 15 फूट उंचीवरून एवढा जड सिमेंटचा भाग रस्त्यावर पडल्याने जमीन हादरली. त्यामुळे परिसरातील लोकांना भूकंप झाल्यासारखा भास झाला. त्यानंतर परिसरात प्रचंड घबराटही पसरली. नंतर क्रेन खाली कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. क्रेनची वायर तुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कुठल्याही मालमत्तेची हानी झाली नाही. मात्र या अपघाताने रेल्वे प्रकल्पादरम्यानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ दिल्ली नव्हे तर संपूर्ण देशभरातील सर्वच महानगरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे अशा प्रकल्पाच्या ठिकाणी खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

…तर मोठी जीवितहानी झाली असती!

दिल्ली-मेरठ कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 50 टन सिमेंट आणले जात होते. त्याचवेळी वायर तुटून सिमेंटचा भलामोठा भाग रस्त्यावर पडला. हा भाग थोडासा जरा बाहेर आला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये हा अपघात झाला. देशातील पहिली रॅपिड ट्रेन 14 मे रोजी गाझियाबादला येणार आहे. 7 मे रोजी रॅपिड रेल्वेची चावी भारत सरकारने NCRTC कडे सुपूर्द केली. या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये असलेल्या हरमुखपुरी गेट नंबर-2 समोर मंगळवारी काम सुरू होते. मोदीनगर नॉर्थ स्टेशनजवळ लॉन्चिंग गार्ड (क्रेन) च्या चाचणीदरम्यान सेगमेंट घसरला आणि बॅरिकेडिंगजवळ गेला. हा लाँचिंग गार्ड नुकताच बसवण्यात आला होता. त्याची भारवहन क्षमता तपासण्यासाठी वजन उचलून भारक्षमता चाचणी केली जात होती. याचदरम्यान पहिला भाग उचलत असताना तो काही उंचीवरून घसरला आणि बॅरिकेडिंगच्या आत आला आणि आवाज झाला. प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांची काळजी : एनसीआरटीसी

एनसीआरटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या काळात प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांची काळजी घेण्यात आली आहे. घटनेचा वाहतुकीवरही परिणाम झाला नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. सिमेंटचा भाग खाली कोसळताच जमीन पूर्णपणे हलली होती. हा भाग 15 फूट उंचीवरून खाली पडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तेथे उभ्या असलेल्या एका कारला किरकोळ ओरखडे पडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, परिस्थितीची माहिती घेण्यासाठी दिल्ली अग्निशमन दल आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.