AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळचा मुख्यमंत्री कोण होणार? राजधानीत घडामोडींना वेग… बड्या नेत्याने दिली मोठी अपडेट

Kerala CM : केरळमध्ये काँग्रेसला तीन प्रमुख नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करायची आहे, पण अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

केरळचा मुख्यमंत्री कोण होणार? राजधानीत घडामोडींना वेग... बड्या नेत्याने दिली मोठी अपडेट
Kerala CMImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 09, 2026 | 10:46 PM
Share

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र आता पक्षासमोर मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसला तीन प्रमुख नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करायची आहे, पण अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. यासाठी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यात महत्त्वाची बैठक झाली मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत झालेले नाही.

लवकरच मुंख्यमंत्री ठरणार

दिल्लीतील बैठकीनंतर काँग्रेस नेत्या दीपा दास मुंशी यांनी सांगितले की मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. मात्र नेमकी तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. 23 मे ही केरळमध्ये सरकार स्थापनेची अंतिम मुदत आहे. त्याआधी नवीन सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवू इच्छित असल्याने काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोषही दिसून येत आहे.

तीनही पक्षांचा मुख्यमंत्रीपदावर दावा

(UDF) ला केरळ विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र आता मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणे काँग्रेससाठी कठीण ठरत आहे, कारण आघाडीत तीन प्रमुख गट असून प्रत्येक गट आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी करत आहे. काँग्रेसकडे स्वतःचे वरिष्ठ नेते आहेत. दुसरीकडे CPI(M) कडेही स्वतःचा नेता आहे. तसेच केरळ काँग्रेसचाही स्वतंत्र नेता आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रयत्नात असल्याने निर्णय प्रक्रियेत गुंतागुंत वाढली आहे.

महत्त्वाची बैठक

आज केरळमधील मुख्यमंत्री निवडण्यासाठी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह केरळमधील वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला, व्ही डी सतीषन, आणि केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ उपस्थित होते. ही बैठक तीन तासांहून अधिक काळ चालली. मुख्यमंत्रीपदासाठी कोण योग्य ठरेल यावर सर्वांनी आपली मते मांडली. मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम झालेले नाही.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!