Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ममता बॅनर्जींनी कोणाला मैदानात उतरवलं? भाजपसमोर कोणाचं आव्हान?
पश्चिम बंगालमधील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत .

पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारांची घोषणा केली आहे. टीएमसीने नंदीग्राममध्ये संचिता प्रधान आणि रेजीनगरमध्ये रबीऊल आलम चौधरी यांना उमेदवारी दिली.
टीएमसीने रविवारी सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटलं की, ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात तृणमूल काँग्रेसने नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. संचिता प्रधान आणि रबीउल आलम चौधरी यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा. आम्हाला अपेक्षा आहे की दोघे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील.
पश्चिम बंगामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात होणार्या पोटनिवडणुकीसाठी अखेर तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली.
काँग्रेस पक्षाने म्हटलं की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम बंगालच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन नावांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रेजीनगर विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद अब्दुल्लाहिल काफी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून मिलन प्रधान यांना उमेदवारी दिली आहे.
दोन ठिकाणी पोटनिवडणुका का घेण्यात येत आहे?
पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भबानीपूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. तर आम जनता उन्नय पार्टीचे संस्थापक हुमायूं कबीर हे देखील रेजीनगर आणि नौदा या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी दोन्ही मतदारसंघात बाजी मारली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा भबानीपूर मतादरसंघात पराभव केला. त्यानंतर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ सोडला. तर हूमायू कबीर यांनी नौदी मतदारसंघातून आमदारकी कायम ठेवली. त्यानंतर रेजीनगरमधील आमदारकी सोडली.
कधी होणार निवडणुका?
निवडणूक आयोगाने दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी 6 ऑक्टोबर तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर असणार आहे. यंदा तृणमूल काँग्रेसचे दोन गट पोटनिवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.