आंध्र 0, तामिळनाडू 0, महाराष्ट्र 20, भाजपसाठी ममतांचा एक्झिट पोल

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील हल्ल्यानंतर कोलकात्यात प्रचाराचा कालावधी कमी करण्यात आलाय. यावरुन ममता दीदींनी भाजपवर आरोप करत, हा मोदी-शाह यांचा निर्णय असल्याचं म्हटलंय. तर भाजपसाठी त्यांनी एक्झिट पोलही सांगितलाय. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ममता म्हणाल्या. आंध्र …

आंध्र 0, तामिळनाडू 0, महाराष्ट्र 20, भाजपसाठी ममतांचा एक्झिट पोल

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीतील हल्ल्यानंतर कोलकात्यात प्रचाराचा कालावधी कमी करण्यात आलाय. यावरुन ममता दीदींनी भाजपवर आरोप करत, हा मोदी-शाह यांचा निर्णय असल्याचं म्हटलंय. तर भाजपसाठी त्यांनी एक्झिट पोलही सांगितलाय. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचं ममता म्हणाल्या.

आंध्र प्रदेश 0…. तामिळनाडू 0… महाराष्ट्र 20.. 200 जागा गेल्या, असं म्हणत ममतांनी भाजपवर टीका केली. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातील आठ राज्यांमध्ये 59 जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगाल हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, 2014 च्या निवडणुकीत इथे भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दुसरीकडे होणारं नुकसान बंगालमध्ये भरुन काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

अमित शाह यांच्या रॅलीत झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराची वेळ गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत केली. शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपणार होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ममतांनी जोरदार टीकाही केली. भाजपने टीएमसीच्या कार्यकर्त्यांना गुंडांची उपमा दिली आहे, तर ममतांनीही आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय.

लोकसभेसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होतंय. यापैकी सहा टप्प्यांचं मतदान यापूर्वीच पार पडलंय. अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांमध्ये मतदान होईल. यामध्ये बिहारच्या 8, झारखंड 3, मध्य प्रदेश 8, पश्चिम बंगाल 9, चंदीगड 01, उत्तर प्रदेश 13 आणि हिमाचल प्रदेशातील 4 जागांवर मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत. उत्तर प्रदेश (80) आणि महाराष्ट्रानंतर (48) सर्वाधिक जागा असणारं बंगाल हे तिसरं राज्य आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *