मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ

Manipur Bomb Blast : मणिपूरमधील काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते केईशम मेघचंद्र सिंह यांच्या घराजवळ रात्री सुमारे 8.15 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला आहे.

मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
Congress MLA house bomb attack
Image Credit source: Google
| Updated on: Sep 03, 2026 | 11:39 PM

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील यैरिपोक परिसरात काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते केईशम मेघचंद्र सिंह यांच्या घराजवळ रात्री सुमारे 8.15 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने काँग्रेस नेते मेघचंद्र सिंह यांच्या घराच्या दिशेने स्फोटक फेकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

केईशम मेघचंद्र सिंह हे यापूर्वी मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, अलीकडेच काँग्रेसने त्यांच्या जागी तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओकराम इबोबी सिंह यांची मणिपूर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर मेघचंद्र सिंह यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज त्यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाला.

एक दिवस आधीच सरकारला विचारले होते प्रश्न

बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच 2 सप्टेंबर 2026 रोजी मेघचंद्र सिंह यांनी राज्यातील जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला विधानसभेत प्रश्न विचारला होता. यावर मणिपूरचे गृहमंत्री कोंथौजम गोविंदस सिंह यांनी राज्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

गृहमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि मानवतेची भावना कायम ठेवली पाहिजे. विधानसभेतील चर्चेदरम्यान त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच, मणिपूरमधील सर्व धार्मिक आणि सामाजिक नेत्यांनी पुढे येऊन विविध समुदायांमधील विश्वासाची कमतरता दूर करण्यासाठी आणि या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

हिंसाचारामुळे 60 हजार लोक विस्थापित

मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत सांगितले की, 3 मे 2023 रोजी सुरू झालेल्या जातीय हिंसाचारामुळे सुमारे 60 हजार लोक विस्थापित झाले होते. त्यापैकी जवळपास 36 हजार लोकांचे आतापर्यंत पुनर्वसन करण्यात आले आहे. जे लोक आपल्या घरी परतले आहेत, त्यांनाही रोजगार आणि उत्पन्नाच्या संधींच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us