AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मी आत्महत्या करेन.., डॉ. मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितला तो किस्सा!

पुस्तक येण्याआधी कुरेशी यांनी त्या प्रसंगाबाबत सांगितलं आहे. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते एक संविधानावर तसेच लोकशाहीवर विश्वास असणारे नेते होते, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार हा प्रसंग 2012 सालचा आहे.

तर मी आत्महत्या करेन.., डॉ. मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितला तो किस्सा!
manmohan singh and s y quraishi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 9:28 PM
Share

Dr. Manmohan Singh : काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. त्यांनी या देशासाठी केलेलं काम त्यांच्या योजना यामुळे देशाने मोठी घोडदौड केली. लोकशाहीवर विश्वास असणारे हे काँग्रेसचे सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक होते. ते आज हयात नसले तरीही त्यांच्या आठवणी वेगवेगळ्या रुपात आजही तेवढ्यात ताज्या आहेत. दरम्यान,

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांचे ‘इंडिया अँड आय :अ हंड्रेड मेमोरीज, नॉट अ मेमॉयर’ नावाचे एक पुस्तक येत आहे. या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांची अशीच एक खास आठवण सांगण्यात आली आहे. उद्विग्न होऊन मनमोहन सिंग कुरेशी यांना …तर मी आत्महत्या करेन, असे म्हणाले होते. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याबाबत एस वाय कुरेशी यांनी आपल्या पुस्तकात सविस्तर सांगितलेलं आहे.

पुस्तक येण्याआधी कुरेशी यांनी त्या प्रसंगाबाबत सांगितलं आहे. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते एक संविधानावर तसेच लोकशाहीवर विश्वास असणारे नेते होते, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार हा प्रसंग 2012 सालचा आहे. तेव्हाचे कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिमांचे आरक्षण 4.5 टक्क्यांहून 9 टक्क्यांपर्यंत वाढवू आसे आश्वासन दिले होते. नंतर याच आश्वासनाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची निवडणूक आयुक्तांपुढे सुनावणी झाली. अभिषेक मनु सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू मांडली तर अरुण जेटली यांनी भाजपाची बाजू मांडली. निवडणुकीचा प्रचार करताना काय बंधनं असावीत, याबाबतचा हा वाद होता, असं कुरेशी यांनी सांगितलं आहे.

तसेच, आमची कारवाई खुर्शिद यांना आवडली नाही. त्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक आयोगावर टीका केली जाऊ लागली. निवडणूक आयोग घमंडी आणि मनमानी कारभार करत आहे, असा दावा केला जाऊ लागला. मी हीच बाब नंतर हरीश खरे यांच्या कानावर घातली. खरे तेव्हा पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी होते. खरे यांनी माझ्या मनातील भावना पंतप्रधानांना सांगितल्या. मला अशा प्रकारच्या टीकेचे काही वाटत नाही. परंतु अशा टीकेमुळे एखाद्या संस्थेची विश्वासार्हता कमी होते. हीच बाब मला जास्त चिंताजनक वाटते, असे मी खरे यांना सांगितले, असं पुढे कुरेशी यांनी सांगितलं.

त्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मला कॉल केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्या नाराजीचा विषय काढला. तुम्ही जर असा विचार करत असाल तर मी आत्महत्या करेन. तुम्हाला असे काही वाटेल याची मला खरंच कल्पना नव्हता. मला याची कल्पना असती तर मी आमच्या नेत्यांना सांगितलं असतं. तुम्हाला काही तक्रार असेल तर मला फक्त फोन करा, असं मला डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते, अशी आठवण कुरेशी यांनी कुरेशी यांनी आवर्जून सांगितली. दरम्यान, आता कुरेशी यांच्या पुस्तकात नेमकं काय काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....