पाकिस्तानी तरुणीशी विवाह, बडतर्फ जवान मुनीर अहमदचा धक्कादायक दावा, म्हणाला मला आधीच…

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) च्या 41 व्या बटालियनचा जवान मुनीर अहमद याने सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे त्याला ताक्ताळ सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यानं आता धक्कादायक दावा केला आहे.

पाकिस्तानी तरुणीशी विवाह, बडतर्फ जवान मुनीर अहमदचा धक्कादायक दावा, म्हणाला मला आधीच...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2025 | 8:18 PM

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) च्या 41 व्या बटालियनचा जवान मुनीर अहमद याने सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे त्याला ताक्ताळ सेवेतून बडर्तफ करण्यात आलं आहे. पाकिस्तानी तरुणीशी लग्न करून तिचा व्हिसा संपल्यानंतर देखील तिला भारतात आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून, सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. या प्रकरणात आता त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाला मुनीर अहमद? 

मीडियाच्या माध्यमातून मला माझ्या बडतर्फीची माहिती मिळाली. सीआरपीएफकडून माझ्या बडतर्फीची माहिती देणारे पत्र मिळाले आहे. हा निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी धक्कादायक आहे.  कारण मी पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी मुख्यालयाकडून परवानगी मागितली होती आणि मला तशी परवानगी मिळाली होती, असा दावा त्याने केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मुनीर अहमद याने लग्न केले. लग्नासाठी ही तरुणी 28 फेब्रुवारी रोजी वाघा- अटारी सीमेवरून भारतात दाखल झाली होती. मात्र या तरुणीची अल्पकालीन व्हिसाची मुदत 22 मार्च रोजी संपली, परंतु व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील  या जवानाने तिला आपल्या घरात आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे, सध्या या प्रकरणात उच्च न्यायालयानं या तरुणीच्या हद्दपारीला स्थगिती दिली असून, ही तरुणी आता अहमदच्या जम्मू येथील निवासस्थानी राहत आहे.

या प्रकरणात प्रतिक्रिया देताना आता महमदने धक्कादायक दावा केला आहे. मी ३१ डिसेंबर २०२२ रोजी पहिला पत्रव्यवहार केला होता, ज्यामध्ये मी पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करण्याची माझी इच्छा सांगितली, त्यानंतर मला पासपोर्ट, लग्नपत्रिका आणि शपथपत्राच्या प्रती जोडणे यासारख्या औपचारिकता पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मी  माझे आणि माझ्या पालकांचे, सरपंचांचे आणि जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. अखेर ३० एप्रिल २०२४ रोजी मुख्यालयाकडून मला मंजुरी मिळाली. ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) साठी अर्ज केला होता, परंतु त्याला सांगण्यात आले की अशी कोणतीही तरतूद उपलब्ध नाही. नियमांनुसार परदेशी नागरिकाशी झालेल्या तुमच्या लग्नाची माहिती सरकारला आधीच देऊन तुम्ही औपचारिकता पूर्ण केली आहे, असा दावा मुनीर याने केला आहे.