AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज; योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरिजम, पत्रकारीता, मास मिडीया, चित्रपट निर्मितीशी संबंधीत विविध व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू आहे

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज; योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 22, 2022 | 4:21 PM
Share

मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील (minority community) व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून (Maulana Azad Minority Economic Development Corporation) 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन (Call to Apply) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

व्यावसायीक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पात्र

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरिजम, पत्रकारीता, मास मिडीया, चित्रपट निर्मितीशी संबंधीत विविध व्यावसायीक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध असल्याचे डॉ. शेख यांनी सांगितले.

अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 16 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 18 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत.

व्याजदर फक्त 3 टक्के

दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त 3 टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

कार्यालयात संपर्क साधा

योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?