AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Cabinet Reshuffle : चार पॉइंटमध्ये समजून घ्या मोदी मंत्रिमंडळ फेरबदल, महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN होणार, कोण OUT

Modi Cabinet Reshuffle : मागच्या अनेक दिवसांपासून मोदी मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा आहे. ताज्या बातमीनुसार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलावर केव्हाही निर्णय होऊ शकतो. समजून घ्या पूर्ण गणित.

Modi Cabinet Reshuffle : चार पॉइंटमध्ये समजून घ्या मोदी मंत्रिमंडळ फेरबदल, महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN होणार, कोण OUT
Modi Cabinet Reshuffle
| Updated on: Sep 03, 2026 | 5:08 PM
Share

मागच्या अनेक दिवसांपासून मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा चर्चा सुरु आहेत. ताज्या बातमीनुसार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलावर केव्हाही निर्णय होऊ शकतो. बदल झाल्यानंतर कॅबिनेट कसं असेल?, मंत्रिमंडळाची रचना कशी असेल? यावर दिल्लीत विविध चर्चा सुरु आहेत. कॅबिनेट फेरबदलात एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे नवीन कॅबिनेट जास्त युवा असेल. मंत्रिमंडळात जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना संधी मिळेल. 2014 साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. त्यावर मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं सरासरी वय 60 वर्ष होतं. 2019 साली मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं. त्यावेळी मंत्र्यांचं सरासरी वय 59 होतं. 2024 च्या कॅबिनेटमध्ये सरासरी वय अजून एक वर्षाने कमी झालं. सध्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 20 मंत्र्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे. या कॅटेगरीमध्ये जीतम राम मांझी सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत. चिराग पासवान आणि राम मोहून नायडू हे सर्वात तरुण मंत्री आहेत. त्यांचं वय 45 पेक्षा कमी आहे.

चार मंत्र्यांची वयोमर्यादा 60 पेक्षा जास्त आहे. केंद्रीय कॅबिनेटमधील राज्य मंत्र्यांचं सरासरी वय 57 वर्ष आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाचा ट्रेंड लक्षात घेतला तर प्रत्येकवेळी मंत्रिमंडळ विस्ताराने चकवलं आहे. ज्या राज्यात निवडणुका असतात, तिथल्या खासदारांना मंत्रिमंडळ विस्तारात प्राथमिकता दिली जाते हे आतापर्यंत दिसलय. त्या शिवाय नॉन-परफॉर्मर आणि वादग्रस्त मंत्र्यांना सुद्धा हटवण्याची अनेक उदाहरणं आहेत. हाच फॉर्म्युला या फेरबदलातही लागू होऊ शकतो.

मंत्रिमंडळ फेरबदलात दिसू शकतात हे चार फॅक्टर

1) बिहारमधून केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 8 मंत्री आहेत. यात कॅबिनेट रँकचे 4 आणि 4 राज्यमंत्री आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊन गेल्या आहेत. 2021 च्या कॅबिनेट विस्तारात बिहारमधून येणाऱ्या रविशंकर प्रसाद यांना हटवलं. यावेळी सुद्धा बिहारच्या मंत्र्यांना हटवलं जाऊ शकतं.

2) महाराष्ट्र आणि गुजरातमधून प्रत्येकी 6-6 मंत्री आहे. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका होऊन दोन वर्ष झाली आहेत. अलीकडेच पीयूष गोयल यांना भाजपचं खजिनदार बनवण्यात आलं. गोयल मंत्रिमंडळात राहणार की जाणार, या बाबत अजूनपर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही.

3) यूपी आणि पंजाबमधून जास्तीत जास्त मंत्री बनवले जाऊ शकतात. यूपी भाजपं अध्यक्ष पंकज चौधरी कॅबिनेट राज्य मंत्री आहेत. पंजाबमधून भाजपं कोट्यातून मंत्र्यांची संख्या वाढवली जाऊ शकते. पंजाब कोट्यातून अलीकडेच रवनीत बिट्टू यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला.

4) कॅबिनेटमध्ये अनेकदा अशा नेत्यांना मंत्री बनवण्यात आलय जे राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य नव्हते. याचं मोठ उदहारण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आहेत. 2019 साली परराष्ट्र मंत्री बनल्यानंतर जयशंकर राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचले. यंदाच्या मंत्रिमंडळात विस्तारातही अशा पद्धतीने मंत्री बनवले जाऊ शकतात.

Follow Us
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय