Pm modi : हिवाळी अधिवेशनाच्या आधी मोदींनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, या मुद्द्यावर होणार बैठकीत चर्चा…

| Updated on: Nov 28, 2021 | 10:46 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची मोदींनी बैठक बोलावली आहे. वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर सरकारनं नमतेपणा घेत अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. त्याबाबत या अधिवेशनात महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. हा मुद्दा या अधिवेशनात जोरदार गाजण्याची शक्यता आहे.

Pm modi : हिवाळी अधिवेशनाच्या आधी मोदींनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, या मुद्द्यावर होणार बैठकीत चर्चा...
narendra modi
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची मोदींनी बैठक बोलावली आहे. त्यात काही महत्वाच्याा मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसनेही 29 नोव्हेंबरला विरोधी पक्षातील विविध नेत्यांची बैठक बोलवली आहे. सर्वपक्षीय बैठकीत सर्व सत्राच्या दरम्यानं होणाऱ्या महत्वपूर्ण कामकाजाबाबत आणि अजेंडा याबाबत चर्चा होईल. दोन्ही सभागृहात विविध मुद्यावर चर्चा करत असताना विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. या अधिवेशनात सरकारने 26 महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सूची तायर केली आहे.

तिन्ही कृषी कायदे मागे घेतले त्यावर चर्चा

वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर सरकारनं नमतेपणा घेत अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. त्याबाबत या अधिवेशनात महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. अलिकडेची मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. हा मुद्दा या अधिवेशनात जोरदार गाजण्याची शक्यता आहे. तसेच या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीबाबतही चर्चा होणार आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना व्हीप जारी करण्याात आला आहेत. इतर कामकाजाच्या नियोजनाबाबत संसदीय कामकाज समितीची वेगळी बैठक होणार आहे. संसदेचं हे अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

ओम बिरला सर्वांशी चर्चा करणार

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला सोमवारी सर्व सदस्यांशी चर्चा करणार आहेत. संविधान दिवसावर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्यानंतर ओम बिरला यांनी चिंता व्यक्त केली होती. सरकारला विविध मुद्यावरून घेरण्यासाठी काँग्रेसने विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी सोमवारी बैठक बोलवली आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांची झोप उडवली आहे. त्यामुळे या अधिवेशनात कोणते मुद्दे जास्त गाजणार हे पाहणं महत्वााचं ठरणार आहे.

VIDEO: ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण, मलिक म्हणतात, ‘बाते कम, काम ज्यादा’ हेच आमचं धोरण

कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय

Health Care : हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये ‘या’ खास पेयाचा समावेश करा!