जनगणनेचे चक्र बदलणार, 2025 पासून सुरु होणार जनगणना, जातीय जनगणनाही होणार का?

Census To Start In 2025: अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते.

जनगणनेचे चक्र बदलणार, 2025 पासून सुरु होणार जनगणना, जातीय जनगणनाही होणार का?
census from 2025
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 10:20 AM

Census To Start In 2025: देशात आता जनगणनेस सुरुवात होणार आहे. परंतु जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा 14 वर्षांनी होणार आहे. 2011 नंतर आता 2025 मध्ये जनगणना होणार असून त्यानंतर 2035, 2045, 2055 अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी 1991, 2001, 2011 अशी जनगणना झाली होती. आता 2025 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. 2025 मध्ये सुरु होणार जनगणना 2026 पर्यंत चालणार आहे. 2021 मध्ये कोरोनामुळे जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताच खुलासा अजून झालेला नाही.

अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. या वेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.

जनगणनेत आतापर्यंत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. परंतु यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. जसे कर्नाटकात सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. त्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

जातीय जनगणना होणार का?

2026 मध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोध पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीही केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

जनगणनेचा इतिहास असा

भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. भारताची पहिली संपूर्ण जनगणना 1881 मध्ये आयुक्त डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी केली होती. त्यानंतर हे दर 10 वर्षांनी एकदा जनगणना होत आली. मात्र, त्यातही काही वेळा अंतर दिसून आले.

  • 1872
  • 1881
  • 1891
  • 1901
  • 1911
  • 1921
  • 1931
  • 1941

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जनगणना 1951 मध्ये झाली.

  • 1951
  • 1961
  • 1971
  • 1991
  • 2001
  • 2011
Non Stop LIVE Update
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.
भाजपवर बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली, 'त्या' वक्तव्यानं नवा वाद
भाजपवर बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली, 'त्या' वक्तव्यानं नवा वाद.
एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, विठुच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?
एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं, विठुच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?.
गुवाहाटी.. रेल्वे अन् विमान तिकीट, शहाजीबापू आणि ठाकरे यांच्यात जुंपली
गुवाहाटी.. रेल्वे अन् विमान तिकीट, शहाजीबापू आणि ठाकरे यांच्यात जुंपली.
'धनुभाऊंसाठी कमळ असतं तर...', पंकजा मुंडेंचं भर सभेत मोठं वक्तव्य
'धनुभाऊंसाठी कमळ असतं तर...', पंकजा मुंडेंचं भर सभेत मोठं वक्तव्य.