Monsoon : लो मै आया… प्रतीक्षा संपली, मान्सून अंदमानात दाखल, देशभराच्या नजरा आता केरळकडे!

Monsoon : लो मै आया... प्रतीक्षा संपली, मान्सून अंदमानात दाखल, देशभराच्या नजरा आता केरळकडे!
पावसाची खबरबात
Image Credit source: tv9 marathi

देशभरात उष्णतेची लाट असतानाच मान्सूनचे आगमन होणार ही मोठी दिलासादायक बाब आहे. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. राज्यात सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला असून उष्मघाताने सर्वाधिक मूत्यू याच विभागात झाले आहेत. मात्र, मान्सून आता बंगालच्या उपसागरातून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे.

राजेंद्र खराडे

|

May 16, 2022 | 5:34 PM

मुंबई : ज्याच्या आगमनाने सर्वकाही बदलून जाणार आहे तो (Monsoon) मान्सून आता अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यंदा सुरवातीपासूनच मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. अखेर तो अंदाज आता खरा ठरला असून लो मै आया असेच म्हणत तो दाखल झाला आहे. यापुर्वी मान्सून 27 मे रोजी अंदमान-निकोबार येथे दाखल होऊन 1 जून रोजी (Kerala) केरळात धडकणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण यंदा मान्सूनच्या बाबतीत सर्वकाही वेळेपूर्वीच होत आहे. 16 मे रोजीच तो अंदमानमध्ये दाखल झाला असून पुढील आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. अनेक वर्षानंतर मान्सून वेळेत दाखल होत असून त्याचे शेती व्यवसयाच्या दृष्टीकोनातून अधिकचे फायदे आहेत.

केरळमध्ये ऑरेंज अलर्ट

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम या सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तिरुवनंतपुरम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेतून मिळणार दिलासा

देशभरात उष्णतेची लाट असतानाच मान्सूनचे आगमन होणार ही मोठी दिलासादायक बाब आहे. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. राज्यात सर्वाधिक फटका नागपूर विभागाला बसला असून उष्मघाताने सर्वाधिक मूत्यू याच विभागात झाले आहेत. मात्र, मान्सून आता बंगालच्या उपसागरातून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान-निकोबार आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे. मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या आठवड्यात उत्तराखंड, मेघालय, आसाम आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपासाठी पोषक वातावरण

गतवर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून सर्वकाही वेळेवर होत आहे. पावासाचे आगमन वेळेवर होत असले तरी रब्बी हंगाम लांबल्याने अजूनही हंगामपूर्व मशागतीची कामे शिल्लक आहेत. पावासाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मान्सून ज्याप्रमाणे वेळेत दाखल होत आहे त्याचप्रमाणे वेळेत खरिपाच्या पेरण्या झाल्या तर उत्पादनातही भर पडणार आहे. खरिपाच्या दृष्टीने कृषी विभागही तत्पर असून शेतकऱ्यांनाच आता उर्वरीत कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें