AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार… या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार

Heavy Rainfall Alert : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. आता उद्या अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळणार आहे.

Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार... या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार
IMD Heavy Monsoon Rain Alert for these StatesImage Credit source: Google
| Updated on: Jun 08, 2026 | 10:16 PM
Share

देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे, खासकरून दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता 9 जून रोजी देशातील विविध राज्यांमध्ये संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यामुळे आता मंगळवारी दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते जाणून घेऊयात.

उत्तर भारतात उष्णतेचा तडाखा कायम राहणार

मंगळवारी उत्तर भारतातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते. या भागांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. तसेच पूर्व राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पावसाची शक्यता

छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात 9 ते 14 जूनदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 9 जून रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 10 जूनपासून मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कर्नाटक आणि तमिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण भारतात 9 जून रोजी मान्सून सर्वाधिक सक्रिय राहणार आहे. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खासकरून कर्नाटक आणि केरळमध्ये 9 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा भागातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा

ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये 9 ते 14 जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी अरुणाचल प्रदेशमध्ये अतिमुसळधार पाऊस, तर इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागात पूरस्थिती, भूस्खलन आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा इशाराही दिला आहे. ज्या भागात पावसाची शक्यता आहे, त्या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी