AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himachal Pradesh: बसवर डोंगर कोसळला अन् क्षणात सगळं सपलं, 15 जणांचा जागीच मृत्यू

हिमाचल प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. बिलासपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Himachal Pradesh: बसवर डोंगर कोसळला अन् क्षणात सगळं सपलं, 15 जणांचा जागीच मृत्यू
bilaspur bus accident
| Updated on: Oct 07, 2025 | 9:26 PM
Share

हिमाचल प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. बिलासपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले असू मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या घटनास्थशी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही पोहोचले असून जेसीबीच्या मदतीने माती हटवली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बसमध्ये 30 प्रवासी होते

मंगळवारी सायंकाळी झंडुता विधानसभा मतदारसंघातील बार्थिन येथील भल्लू पुलावरून एक बस जात होती. या बसमधून जवळपास 30 प्रवासी प्रवास करत होते. बस पुलावर येताच अचानक डोंगराला तडा गेला आणि मातीचा ढिगारा बसवर पडला. यामुळे बसमधील प्रवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीचा वापर

या घटेनेची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या जेसीबीच्या मदतीने बसवरील माती हटवली जात आहे. काही जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळीच सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. उर्वरित 9 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बसमधून तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मदतकार्य सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. सुखू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

बिलासपूर प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याचे निर्देश

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे बिलासपूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. सुखू यांनी मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्या उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचेही निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...