AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपी गजब है! ‘गोमूत्र फिनाईल’नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट

देशातील काही राज्यांमध्ये कधी काय आदेश निघतील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, मध्यप्रदेश सरकारने एक अजबच फर्मान काढलं आहे. (MP govt offices to be cleaned with cow urine phenyl only )

एमपी गजब है! 'गोमूत्र फिनाईल'नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट
| Updated on: Feb 02, 2021 | 5:17 PM
Share

भोपाळ: देशातील काही राज्यांमध्ये कधी काय आदेश निघतील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, मध्यप्रदेश सरकारने एक अजबच फर्मान काढलं आहे. यापुढे सरकारी कार्यालये गोमूत्राद्वारे तयार करण्यात आलेल्या फिनाईलनेच स्वच्छ करण्यात यावेत असे आदेशच सरकारने काढले आहेत. आता या आदेशाने सरकारी बाबूंसमोर धर्मसंकट उभं राहिलं नसेल तर नवलंच. (MP govt offices to be cleaned with cow urine phenyl only )

मध्यप्रदेश सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश काढले आहेत. राज्यातील सर्व सरकारी कार्यालये केवळ गोमूत्र आणि फिनाईलनेच स्वच्छ करावेत. केमिकल मिश्रित फिनाईलने कार्यालयाची स्वच्छता करण्यात येऊ नये, असं या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या अजब निर्णयाची सोशल मीडियातून चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

बाबा रामदेव यांना सर्वाधिक आनंद

सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी त्याला विरोध केला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मध्यप्रदेश सरकारला तर गोमूत्र सरकार म्हटलं आहे. तर, गोमूत्र फिनाईलपेक्षा काही वेगळी आयडिया तुमच्याकडे नव्हती का? असा सवाल काही यूजर्सनी केला आहे. काही यूजर्संनी तर या वादात बाबा रामदेव यांनाही घुसवले आहे. मध्यप्रदेश सरकारने गोमूत्र फिनाईलने कार्यालये स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे सर्वाधिक आनंद बाबा रामदेव यांनाच होईल, असा टोला काही यूजर्सनी लगावला आहे. गाईंची काळजी घ्या आणि गोमूत्र फिनाईलचा वापर करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कारखाने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन

दरम्यान, पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लोकांनी गोमूत्र फिनाईलचे कारखाने सुरू करावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही उत्पादनापूर्वीच गोमूत्र फिनाईलची मागणी वाढवली आहे. त्यामुळे दूध दिल्यानंतरही लोक गाईंना रस्त्यावर मोकाट सोडणार नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातील गायींची देखभालही केली जाणार आहे, असंही ते म्हणाले. (MP govt offices to be cleaned with cow urine phenyl only )

संबंधित बातम्या:

VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना

ह्या बातमीचा महाराष्ट्राला अभिमान, लातुरात हळदी कुंकवाला तृतीय पंथी !

नव्या Vehicle Scrappage Policy मुळे कार आणि बाईकची किंमत किती?; एका क्लिकवर सर्व माहिती

(MP govt offices to be cleaned with cow urine phenyl only )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.