“कर्नाटकात पुन्हा संजय राऊत यांची तोफ धडाडली”; राऊतांना कर्नाटकात भाजपचा निकालाच लावला…

कर्नाटकातील वातावरण आता केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपविरोधात जात असून भाजपचे राजकारण आता जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्नाटकात पुन्हा संजय राऊत यांची तोफ धडाडली; राऊतांना कर्नाटकात भाजपचा निकालाच लावला...
| Updated on: May 03, 2023 | 6:55 PM

बेळगाव : कर्नाटक राज्यातील विधानसभा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणही प्रचडं तापले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ताधारी असल्यामुळे महाविकास आघाडीकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याील खानापूर तालुक्याच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रातून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकातील भाजपला निकालात काढले आहे. कर्नाटकमध्येही भाजप विरोधात काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी लढत होत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

संजय राऊत यांनी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या कामांविषयी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात तर आता काँग्रेसशिवाय पर्याय नसणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि काँग्रेसचेच उमेदवार विजयी होणार असून कर्नाटकातून भाजप हद्दपार होणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकातील आणि बेळगावस खानापूर तालुक्यातील जनता सुज्ञ असून या निवडणुकीत एकीकरण समितीच्या उमेदवारांना येथील जनता भरघोस मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सध्या कर्नाटकात भाजपविरोधात वारे वाहत असून या निवडणुकीत काँग्रेससह भाजपविरोधातील शक्ती आता एकवटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसलणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्नाटकातील वातावरण आता केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपविरोधात जात असून भाजपचे राजकारण आता जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.