AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी तो बापच… मुलाचं भाषण ऐकून काळजाचं पाणी पाणी… अब्जाधीश मुकेश अंबानी अक्षरश: रडले

अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग इव्हेंटचा आज दुसरा दिवस आहे. या प्री वेडिंग इव्हेंटची थीम अ वॉक ऑन द वाइल्डसाईड आहे. त्यामुळे जामनगरमध्ये आलेल्या पाहुण्यांना जंगलची सफर घडवण्यात आली. दुसरा इव्हेंट संध्याकाळी झाला. मेला रुज असं या इव्हेंटचं नाव होतं. डान्स आणि सॉन्ग परफॉर्मन्सचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. उद्या म्हणजे 3 मार्च रोजी या सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे.

शेवटी तो बापच... मुलाचं भाषण ऐकून काळजाचं पाणी पाणी... अब्जाधीश मुकेश अंबानी अक्षरश: रडले
Mukesh AmbaniImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2024 | 9:28 PM
Share

जामनगर | 2 मार्च 2023 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, भारतातील बलाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचं लग्न होणार आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगचा सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला राजकारण, उद्योग, बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर झाले आहेत. जामनगरमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळीच अवतरली आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. मात्र, आजचा दिवस मुकेश अंबानी यांच्यासाठी खास होता. अनंत अंबानी यांनी यावेळी भाषण केलं. लाडक्या लेकाचं भाषण ऐकून अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्याही काळजाचं पाणी पाणी झालं अन् डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. एवढ्या मोठ्या धन कुबेराला रडताना पाहून उपस्थितांनाही गहिवरून आलं.

प्री वेडिंग इव्हेंटचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी अनंत अंबानी यांनी काळजाला हात घालणारं भाषण केलं. अनंत यांचं हे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले. यावेळी अनंत यांनी हा शानदार सोहळा घडवून आणल्याबद्दल आई वडिलांचे आभार मानले. यावेळी अनंत यांनी लहानपणीच्या अनेक आठवणी जागवल्या. आपल्या आरोग्याच्या समस्यांकडेही लक्ष वेधत त्या प्रसंगातून कसं कसं बाहेर पडलो हे सांगितलं.

अनंत काय म्हणाले?

माझं संपूर्ण आयुष्य गुलाबांच्या फुलासारखं नव्हतं. मी गुलाबसोबत काटेही सहन केले. मला लहानपणापासूनच आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. पण माझ्या आईवडिलांनी मला त्यातून सावरलं. मला कधीच या आरोग्याच्या समस्या जाणवू दिल्या नाहीत. माझ्यासाठी त्यांच्या काळजात होणारी घालमेल त्यांनी मला कधीच जाणवू दिली नाही. ते नेहमीच माझ्यासोबत राहिले. मला धीर दिला, असं अनंत म्हणाले. लेकाचे हे शब्द ऐकून मुकेश अंबानी हेलावले. अन् अक्षरश: त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. एक बाप म्हणून मुकेश अंबानी यांच्यासाठी हा अत्यंत भावूक क्षण होता. मुकेश अंबानी यांना रडताना पाहून अनेका्ंच्या डोळ्यातूनही अश्रू आले.

एक हजार पाहुणे

अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटची सुरुवात एक आठवड्याआधी एका कम्युनिटी डिनरने सुरू झाली. यावेळी शेजारील गावातील हजारो लोकांना मेजवानी देण्यात आली. गुजराती पदार्थांची यावेळी रेलचेल होती. जामनगरमध्ये सुरू असलेल्या या तीन दिवसाच्या कार्यक्रमातील पहिल्या दिवशी बिल गेट्स आणि मार्क जुकरबर्ग यांच्यासह जगभरातील श्रीमंतांनी हजेरी लावली. या सोहळ्याला जगभरातून एक हजार लोक आले होते. या भव्य कार्यक्रमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान सारखे सुपरस्टारही सामील झाले होते.

रिहाना पहिल्यांदाच भारतात

अंबानी कुटुंबातील या सोहळ्याच्या निमित्ताने जगप्रसिद्ध गायिका रिहाना शुक्रवारी भारतात आली. रिहानाची भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी तिचा रंगारंग परफॉर्मन्स झाला. ‘डायमंड्स’, ‘रूड बॉय’, ‘पोर इट अप’, आदी तिची गाणी हिट आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.