मुंबईवरील हल्ल्याआधी तहव्वूर राणा तिच्यासोबत भारतभर फिरला, ‘ती’ मिस्ट्री गर्ल अखेर कोण?
या मिस्ट्री गर्लचा आणि तहव्वूर राणाचा जवळचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून एनआयएचे अधिकारी तिच्या शोधात आहेत.

Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे. आता त्याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे एनआयएच्या चौकशीत तो अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. दरम्यान, आता एनआयएची नजर आता एका मिस्ट्री गर्लवर आहे.
भारतात आल्यावर राणा होता याच महिलेसोबत
या मिस्ट्री गर्लचा आणि तहव्वूर राणाचा जवळचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून एनआयएचे अधिकारी या मिस्ट्री गर्लच्या शोधात आहेत. ही मिस्ट्री गर्ल भारतात तहव्वूर राणाच्या सोबत दिसली होती. उत्तर प्रदेशातील आगरा आणि हापूड या भागात ही मिस्ट्री गर्ल राणासोबत झळकली होती. याच पार्श्वभूमीवर बरख्यात असणारी ती महिला नेमकी कोण होती? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
महिला तहव्वूर राणाची पत्नी आहे का?
एनआयएनचे अधिकारी तहव्वूर राणाचे उत्तर प्रदेशचे हापूड, आगरा आणि दिल्ली यांच्याशी काय संबंध आहे, याचा घेत आहेत. या तिन्ही ठिकाणाला राणाने भेट दिली होती, त्यावेळी त्याच्यासोबत ही मिस्ट्री गर्ल होती. या महिलेला तहव्वूर राणाने त्याची पत्नी असल्याचे तेव्हा सांगितले होते. त्यामुळे ही महिला खरंच राणाची पत्नी आहे का? की ही महिला एक दहशतवादी होती? याचा शोध आता एनआयएचे अधिकारी घेत आहेत. विशेष म्हणजे ही महिला आता नेमकी कुठे आहे? याचाही तपास एनआयएच्या अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
दरम्यान, आता ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे. तहव्वूर राणाने याच महिलेसोबत भारतातील अनेक ठिकाणांची रेकी केली होती. याच ठिकाणांची ओळख पटवण्यासाठी एनआयए तहव्वूर राणाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याची शक्यता आहे. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी तो 13 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात भारतात आला होता.
तहव्वूर राणाचं एका गोष्टीवर आहे विशेष प्रेम
तहव्वूर राणाची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत त्याने वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. याच माहितीनुसार तहव्वूर राणाला आर्मीच्या ड्रेसवर विशेष प्रेम आहे. त्याचा एक भाऊ पत्रकारदेखील आहे. दहशतवाद्यांच्या बैठकांत तहव्वूर राणा आर्मीचा ड्रेस परिधान करूनच जायचा. सैन्य सोडल्यानंतरही तो आर्मीचा ड्रेस घालायचा, अशी माहिती समोर येत आहे.
