
बंदी घातलेली संघटना सिमी ( SIMI ) संघटनेचा माजी सदस्य असलेला साकीब नाचन याचा दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. साकीब नाचण हा भिवंडीतील पघडा येथे राहणारा असून त्याच्यावर २००२ ते २००३ दरम्यान मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार असल्याचा आरोप होता.
सिमीचा अतिरेकी साकीब नाचन याचा दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ६३ वर्षीय साकीब याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. एनआयएने साल 2023 मध्ये इसिसशी संबंध असल्यावरुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
प्रतिबंधित अतिरेकी संघटना स्टूडेंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे ( सिमी ) माजी सदस्य साकिब नाचन याचा शनिवारी २८ जून रोजी दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तपासले असता त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईपासून ५३ किमीवर असलेल्या बोरिवलीतील पडघा या गावातील एका कोकणी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या साकीब नाचन याचे कुटुंब प्रतिष्ठीत आहे. मुस्लीम समुदाय एक प्रमुख नेते अब्दुल हमीद नाचन यांचा हा तिसरा मुलगा होता. त्याला ११ भावंडे होती.
वाणिज्य पदवीधर असलेल्या नाचन याचे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जमात-ए-इस्लामी या विद्यार्थी संघटनेशी संबंध जुळले. त्यानंतर स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ( SIMI ) संघटनेचा तो सक्रीय सदस्य झाला. या संघटनेने मुंबईत २००२ ते २००३ दरम्यान बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप आहे. सय्यद अब्दुल करीम उर्फ टुंडा आणि भटकळ बंधूं या अतिरेक्यांशी साकीबचा संबंध होता. शस्त्र प्रशिक्षणासाठी अनेक भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्यास मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप होता.